रोहितचे टी -२० WC जिंकण्याचे स्वप्न होणार पूर्ण!! हे ३ खेळाडू बजावू शकतात मोलाची भूमिका...

भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात जोरदार विजय मिळवला. यासह ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ ची आघाडी घेतली आहे. या मालिकेत भारतीय संघाची टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठीची तयारी देखील दिसून आली आहे. संघातील युवा खेळाडूंसह अनुभवी खेळाडू देखील फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. या संघात ३ असे खेळाडू आहेत जे आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतात आणि भारताला जेतेपद मिळवून देऊ शकतात. कोण आहेत ते खेळाडू? चला पाहूया.

) दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) :

दिनेश कार्तिक सध्या भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत चांगली कामगिरी करत त्याने भारतीय संघात जोरदार पुनरागमन केले होते. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १९ चेंडूंमध्ये ४१ धावांची तुफानी खेळी केली होती. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले होते. भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडत असलेल्या दिनेश कार्तिकने ४० टी -२० सामन्यांमध्ये ५२५ धावा केल्या आहेत.

) आर अश्विन ( R Ashwin) :

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने ६ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडिज विरुध्द सुरू असलेल्या टी -२० मालिकेत तो अप्रतिम गोलंदाजी करताना दिसून येत आहे. पहिल्या टी -२० सामन्यात त्याने वेस्ट इंडिजच्या २ मुख्य फलंदाजांना माघारी धाडले होते. अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच आर अश्विन आणि रवींद्र जदेजाची जोडी मैदानावर पाहायला मिळाली होती. अप्रतिम गोलंदाजीसह तो फलंदाजीमध्ये देखील मोलाचे योगदान देत असतो.

) रिषभ पंत (Rishabh pant) : 

भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. मध्यक्रमात फलंदाजीला येऊन तो संघासाठी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत असतो. रिषभ पंत प्रामुख्याने एका हाताने षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत रिषभ पंत भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो.

काय वाटतं? या तीन खेळाडूंपैकी कोणता खेळाडू आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required