फिनिशरची चिंता मिटलीच समजा! भविष्यात हे ३ फलंदाज घेऊ शकतात एमएस धोनीची जागा...

क्रिकेट या खेळात फिनिशरची भूमिका अत्यंत महत्वाची असते. कारण हा संघातील हा फलंदाज कुठल्याही क्षणी येऊन सामना आपल्या दिशेने वळवू शकतो. अनेकदा हे फलंदाज पराभूत होत असलेल्या सामन्यात विजय देखील मिळवून देत असतात. भारतीय संघासाठी २०२० पर्यंत हे काम एमएस धोनी करत होता. मात्र धोनीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता नव्या फिनिशरची गरज आहे.

मात्र आता फिनिशरचा शोध संपला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. भारतीय संघाला ३ फिनिशर मिळाले आहेत, हे येणाऱ्या काळात भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडू शकतात. या ३ फलंदाजांनी आयपीएल २०२२ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. कोण आहेत ते फलंदाज, चला पाहूया.

१) आयुष बदोनी (Ayush badoni) :

युवा फलंदाज आयुष बदोनीने आयपीएल २०२२ स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी अनेकदा महत्वाची भूमिका बजावली आहे. अनेकदा त्याने शेवटी येऊन आपल्या संघाला विजय देखील मिळवून दिला आहे. त्याने या संघासाठी एकूण १३ सामने खेळले, यांत त्याने १ अर्धशतक झळकावत १६१ धावा केल्या आहेत. 

२) शाहबाज अहमद (Shahbaz Ahmad) :

 येणाऱ्या काळात भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडण्यासाठी शाहबाज अहमद देखील प्रबळ दावेदार आहे. भविष्यात तो एमएस धोनी सारखी कामगिरी करू शकतो. आयपीएल २०२२ स्पर्धेत त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने आतापर्यंत १५ सामन्यात २०७ धावा केल्या आहेत. यासह ४ गडी देखील बाद केले आहेत. 

३)जितेश शर्मा (Jitesh Sharma) :

या यादीत तिसरे नाव आहे जितेश शर्मा. जितेश शर्मा देखील येणाऱ्या काळात भारतीय संघासाठी फिनीशरची भूमिका पार पाडू शकतो. आयपीएल २०२२ स्पर्धेत जितेश शर्माने पंजाब किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले. जितेश शर्मा देखील एमएस धोनीसारखा यष्टिरक्षक फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत या संघासाठी एकूण १२ सामने खेळले. यांत त्याने २३४ धावा केल्या आहेत. 

तुम्हांला काय वाटतं यापैकी कुठला फलंदाज येणाऱ्या काळात चांगला फिनिशर होऊ शकतो? कमेंट करून नक्की कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required