उमरान मलिकने टाकलाय ताशी १५५ किमीचा चेंडू; पाहा भारतासाठी सर्वात जलद चेंडू टाकणारे ५ गोलंदाज...

श्रीलंका विरुध्द सुरू असलेल्या टी -२० मालिकेतील पहिल्या सामन्यात उमरान मलीकच्या (Umran malik) वेगवान गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. त्याच्या गोलंदाजी समोर श्रीलंकेचे फलंदाज अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वात जलद चेंडू टाकण्याचा देखील पराक्रम केला आहे. यासह त्याने माजी भारतीय गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा सर्वात जलद गतीने चेंडू टाकण्याचा विक्रम मोडून काढला आहे.

उमरान मलिकने टाकला सर्वात जलद चेंडू...

श्रीलंका संघाची फलंदाजी सुरू असताना, १७ वे षटक टाकण्यासाठी उमरान मलिक गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर दासून शनाका फलंदाजी करत होता. हा चेंडू उमरान मलिकने ताशी १५५ किमी गतीने टाकला. या चेंडूवर श्रीलंकेच्या कर्णधाराने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू एकस्ट्रा कवरच्या हाती गेला. जिथे युजवेंद्र चहलने त्याचा झेल टिपला. यापूर्वी हा विक्रम माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांच्या नावे होता.

भारतीय संघासाठी सर्वात जलद चेंडू टाकणारे गोलंदाज...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वात जलद चेंडू टाकण्याचा विक्रम हा जवागल श्रीनाथ यांच्या नावे होता. त्यांनी ताशी १५४.५ किमी गतीने चेंडू टाकला होता. तर जम्मू काश्मीर एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरान मलिकने हा विक्रम मोडत ताशी १५५ किमी गतीने चेंडू टाकला आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत त्याने ताशी १५७ किमी गतीने चेंडू टाकला होता. चला तर पाहूया भारतीय संघासाठी सर्वात वेगवान चेंडू टाकणारे गोलंदाज.

१) उमरान मलिक : ताशी १५५ किमी.

२) जवागल श्रीनाथ : ताशी १५४.५ किमी.

३) इरफान पठाण: ताशी १५३.७ किमी 

४) मोहम्मद शमी : ताशी १५३.३ किमी

५) जसप्रीत बुमराह : ताशी १५३.२ किमी.

उमरान मलिक येत्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद चेंडू टाकण्याचा विक्रम मोडू शकतो. कारण अनुभवाने त्याच्या गोलंदाजीची धार आणखी वाढेल.

सबस्क्राईब करा

* indicates required