ICC टी -२० WC स्पर्धेत आर अश्विनने घेतले आहेत सर्वाधिक बळी! पाहा टॉप -५ गोलंदाजांची यादी...

टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. येत्या काही दिवसात सुपर -१२ फेरीतील सामन्यांना देखील प्रारंभ होणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. फलंदाजीच्या बाबतीत भारतीय संघ मजबूत मानला जात आहे. मात्र जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा सारख्या दिग्गज गोलंदाजांच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजी आक्रमण कमजोर मानले जात आहे. मात्र या संघात असा एक गोलंदाज आहे जो, आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. कोण आहे तो गोलंदाज चला पाहूया.

१) आर अश्विन (R Ashwin) :

अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मात्र कसोटी संघातील प्रमुख गोलंदाज आर अश्विन हा टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. आर अश्विनने भारतीय संघासाठी खेळताना १८ सामन्यांमध्ये एकूण २६ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याची गोलंदाजी सरासरी १५.२६ राहिली आहे. तर ६.०१ च्या ईकोनॉमिने त्याने धावा खर्च केल्या आहेत.

२) रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) :

रवींद्र जडेजा भारतीय संघातील प्रमुख फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र दुखापतीमुळे तो आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. त्याने २२ सामन्यांमध्ये २५.१९ च्या सरासरीने आणि ७.१४ च्या इकोनॉमिने २१ गडी बाद केले आहेत.

३) इरफान पठाण (Irfan Pathan) :

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. इरफान पठाणने टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी एकूण १५ सामन्यांमध्ये १६ गडी बाद केले आहेत.

४) हरभजन सिंग (Harbhajan Singh) :

भारतीय संघातील दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगचा देखील या यादीत समावेश आहे. हरभजन सिंगने देखील इरफान पठाण प्रमाणे १६ गडी बाद केले आहेत. त्याने आपल्या कारकीर्दीत आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत एकूण १९ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २९.२५ च्या सरासरीने गोलंदाजी केली आहे. 

५) आशिष नेहरा (Ashish Nehra) :

भारतीय संघाचा माजी गोलंदाज आशिष नेहराचा देखील या यादीत समावेश आहे. आशिष नेहराने आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी एकूण १० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १७.९३ च्या सरासरीने १५ गडी बाद केले आहेत.

काय वाटतं? असा कोणता भारतीय गोलंदाज आहे जो आर अश्विनचा सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम मोडू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required