computer

भारत दक्षिण आफ्रिका टेस्ट मालिका: या पाच बॅट्समनवर असेल भारताची मदार

भारतीय संघाने  २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायला सुरुवात केली आहे.   दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूपैकी ७ खेळाडू असे आहेत जे प्रथमच आफ्रिकेत खेळणार आहेत. गेल्या २९ वर्षात भारताला आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. असे असले तरी भारताच्या ताफ्यात अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडू यांचा समतोल पहायला मिळतो. कर्णधार कोहली आणि टीम नवीन उत्साहाने या आव्हानाला सामोरे जातील. त्यामुळे हा दौरा कसा होतो याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असेल. आज आपण सध्याच्या भारतीय संघातील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५  बॅट्समनवरखेळाडूंवर नजर टाकू.

विराट कोहली

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सातत्याने चांगली कामगिरी करणारा फलंदाज  असे विराटला म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात असो किंवा बाहेर विराटची बॅट तळपली आहे. त्याने १२ सामन्यांमध्ये एकूण १०७५ धावा आणि त्याही ६० च्या  सरासरीने केल्या आहेत. कोहलीने दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये १५३ (सेंच्युरियन) च्या सर्वोच्च स्कोअरसह त्याची सरासरी ५५.८० इतकी आहे. त्यासोबतच विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही ३ अर्धशतके झळकावली आहेत.तीन शतकांपैकी दोन दक्षिण आफ्रिकेत २०१३ आणि २०१८ ला दोन वेगवेगळ्या दौऱ्यांवर आली आहेत.मोठ्या धावसंख्येसाठी विराटचा दोन वर्षांचा संघर्ष सुरू असताना  ही दक्षिण आफ्रिका मालिका कर्णधारासाठी परत फॉर्ममध्ये  येण्यासाठी महत्वाची ठरेल.

चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजारा भारताकडून ३ ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो.  पहिल्या डावात तो शून्यावर आउट झाला आहे पण आजवर टेस्ट प्लेयर म्हणून त्याने स्वतला सिद्ध केले आहे. यावेळी तो त्याच्या चौथ्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. म्हणूनच या दौऱ्यात  सर्वात अनुभवी फलंदाज म्हणून अतिरिक्त जबाबदारी असेल. पुजाराने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ सामने खेळले आहेत - त्यापैकी ७ दक्षिण आफ्रिकेत खेळले आहेत. एकूण ८५८ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीतील एकमेव शतक त्याने २०१३ मध्ये जोहान्सबर्ग येथे केले होते. पाच अर्धशतक त्याच्या नावावर आहेत.पण धावा करताना सरासरी कमी असणे ही चिंतेची बाब आहे. या मालिकेत तो त्याचा पूर्ण अनुभव पणाला लावेल आणि चांगली  कामगिरी करेल ही इच्छा चाहते करतील.

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेचे नुकतेच फलंदाजीतील खराब फॉर्ममुळे कसोटी उपकर्णधारपद हिरावून घेतले आहे . त्यामुळे आगामी भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत तो कसा खेळतो यावर सर्वाची नजर असेल. चेतेश्वर पुजाराप्रमाणे त्यालाही या मालिकेत  आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी धावा कराव्या लागतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १० कसोटींमध्ये एकूण ७४८ धावा केल्या आहेत. एकूण 3 शतके आणि तीन अर्धशतके आणि ५७च्या सरासरीने धावा त्याच्या नावावर आहेत.  दक्षिण आफ्रिकेत जरी त्याला  शतक झळकावता आले नसले तरी २०१८ मध्ये डरबनमध्ये सर्वाधिक ९६ धावा त्याने केल्या आहेत. तसेच जोहान्सबर्ग कसोटीत भारताला विजय मिळवून देणारी त्याची महत्त्वपूर्ण ४८ धावा कोणीही विसरू शकणार नाही. 
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील कामगिरीमुळे त्याला त्याचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळू शकेल.आणि त्यामुळे भारताची फलंदाजी अजून भक्कम होण्यास मदत होईल 

मयंक अग्रवाल

मयांकने नुकत्याच पार पडलेल्या भारत-न्यूझीलंड मालिकेतील दमदार कामगिरी केल्यामुळे  त्याला नक्कीच  आत्मविश्वास असेल. त्याचा हा  पहिला दक्षिण आफ्रिका दौरा असेल.  सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या दुखापतींमुळे मयंकला संधी मिळाली आहे.  त्याचा तो चांगला  फायदा करून घेऊ शकतो. मयंकने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 3 कसोटी सामने खेळले आहेत. पण आताचा फॉर्म पाहता तो चांगली फटकेबाजी करू शकतो. या तीस वर्षीय फलंदाजाच्या कसोटीत आतापर्यंत  ३४० धावा झाल्या आहेत.सेंच्युरियनच्या मैदानावर तो कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरेल.
 

आर अश्विन

हे नाव वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल पण आर अश्विनने फलंदाज म्हणून तळाला खूप चांगली फलंदाजी केली आहे. अनेक प्रसंगी तो भारतासाठी तारणहार ठरला आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याचा चांगला विक्रम आहे.१० सामन्यांमध्ये एकूण २२४ धावा केल्यामुळे अश्विनकडून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. त्याचे एक अर्धशतक सामन्याचा निकाल बदलण्यास कारणीभूत ठरू शकते.फिरकी गोलंदाजीवर आश्विनचे प्रभुत्व आहेच. पण तो एक तळाचा फलंदाज म्हणून ही उपयुक्त ठरला आहे.म्हणून या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.

कोच राहुल द्रविडच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला होईल. २०२२  ची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरद्ध विजयानेच व्हावी  अशी तमाम चाहत्यांना  आशा आहे..All the best team India!


शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required