computer

महिला खेळाडूंना समान वेतन नाही मिळालं तरी चालेल....स्मृती मन्धानाने असं का म्हटलं?

पुरुष आणि महिला  क्रिकेटपटूंना समान वेतन मिळावं ही फार जुनी मागणी आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने नुकतंच प्रमुख क्रिकेटर्ससोबत एक करार केला आहे. या यादीतील विराट कोहली, रोहित शर्मा सारख्या टॉपच्या पुरुष खेळाडूंना वर्षाकाठी ७ कोटी रुपये मिळणार आहेत, तर महिला क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडूंना ५० लाख इतकंच मानधन मिळणार आहे.

याबद्दल आपले विचार मांडताना क्रिकेटर स्म्रिती मन्धाना हिने सांगितलं, की ‘महिला खेळाडूंना मिळणारं कमी वेतन चुकीचं आहे असं मला वाटत नाही.’ तिच्या या मतावर बरीच चर्चा झाली. आज जाणून घेऊया तिच्या या वक्तव्यामागचं कारण काय होतं ते.

एका शुज कंपनीच्या जाहिरातीसाठी आलेली असताना तिला हा प्रश्न विचारण्यात आला होता. ती म्हणाली की ‘मेन्स क्रिकेट सामन्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. जेव्हा वुमेन्स क्रिकेट सामन्यांमधूनही तेवढीच कमाई होईल तेव्हा आपण समान वेतनाची मागणी करू शकतो.’

स्मृती मन्धाना म्हणते की ‘आमची टीम सध्या भारतासाठी सामने जिंकण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. जेणेकरून जास्तीतजास्त गर्दी (प्रेक्षक) जमेल आणि त्यातून जास्तीतजास्त उत्पन्न मिळेल. या गोष्टीवर आमचा कल अधिक आहे. हे साध्य झालं तर इतर गोष्टी सहज साध्य होतील.’ पुढे ती म्हणाली की ‘हे शक्य होण्यासाठी आम्हाला चांगलं  खेळणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला वेतन वाढीवर बोलणे अयोग्य ठरेल.’

स्मृतीने ही गोष्ट फार समजुतीने म्हटली असली तरी बीसीसीआयच्या एकूण कमाईकडे बघता काहीजणांनी ही मागणी  उचलून धरली  आहे. कमाई किती आहे याचं एक उदाहरण पाहू. ४५ दिवसांच्या आयपीएल सामन्यांमधून बीसीसीआयने २००० कोटी कमावले आहेत. याखेरीज वर्षभर झालेल्या सामन्यांमधून वेगवेगळ्या मार्गांनी १२५ कोटींची कमाई झाली आहे.

स्मृती बोलते ते बरोबर वाटतं की बीसीसीआयने सर्वांना समान मानधन द्यावं? तुम्हाला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required