पुरंदर प्रिमिअर लीगचे हे अंपायरराव कशामुळे फेमस झालेत ते तर पाहा!!

Subscribe to Bobhata

अंपायर हा क्रिकेट खेळात सर्वाधिक दुर्लक्षित घटक असतो. सगळा भाव बॉलर आणि बॅट्समन खाऊन जातात. पण अतिशय बारीक निरीक्षण करून निर्णय देणाऱ्या अंपायरांची नावे पण आपल्याला आठवत नाहीत. जे लक्षात राहतात तेही एखाद्या वादात अडकल्यामुळे. कधी कधी त्यांनी दिलेला निर्णय वादग्रस्त ठरतो आणि याची चर्चा चहुबाजूंनी सुरू होते.

भारत विरुद्ध न्यूझीलँड कसोटीत विराटला आऊट दिल्याचा निर्णय असाच वादग्रस्त ठरला होता. म्हणून अंपायरिंग काय सोपे काम नाही असेच समजले जाते. यातही काही अंपायर मात्र चांगलेच कूल असतात. निर्णय देण्याच्या आपल्या अफलातून स्टाईल्सने ते लक्षात राहतात. काही आंतरराष्ट्रीय सामन्यांचे अंपायर भन्नाट पद्धतीने सिक्स किंवा आऊटचा इशारा करताना तुम्ही बघितले असेल.

पुरंदर प्रीमियर लीगमधील एका अंपायरने मात्र सर्व फुटेज खाल्ले आहे. जिल्हास्तरीय सामन्यातील हा अंपायर पूर्ण देशात वायरल झाला आहे. यात सामना सुरू असताना एक बॉलर वाईड बॉल टाकतो. त्यावर एखादा अंपायर काय करेल? तर नुसताच एक हात बाहेर करून मोकळा होईल.\

हा पुरंदर प्रीमियर लीगमधील हा अंपायर मात्र चांगलाच हुशार ठरला. वाईड बॉल पडल्यावर अंपायरने चक्क शीर्षासन केले. खाली डोके वर पाय अशा अवस्थेत अंपायरराव कॅमेऱ्यासमोर दिसतात. त्यातही याच अवस्थेत पाय बाजूला करून त्यांनी वाईडचा निर्णय दिला.

आता हा व्हिडिओ वायरल झाला नसता तरच नवल. हा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला असून यावर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. या निमित्ताने पुरंदर प्रीमियर लीग पण चांगलीच फेमस झाली असेच म्हणावे लागेल.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required