computer

१९ वर्षांखालील स्पर्धेतील बुमरहाच्या बॉलिंगचा व्हायरल व्हिडीओ पाहून घ्या, वेगळीच ऍक्शन होती!!

आजच्या घडीला भारतीय क्रिकेट संघात वेगवान बॉलर म्हणून सर्वात आघाडीचे नाव असेल तर ते म्हणजे जसप्रीत बुमराह हे आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या बॉलिंग स्टाईलने तो बॅट्समनला चकवत असतो. गेल्या काही काळात त्याने आपल्या बॉलिंगने संघाला सावरले आहे.

या पठ्ठ्याला फोकसमध्ये आणले ते मुंबई इंडियन्स या आयपीएल संघाने. २०१३ साली त्याच्या भन्नाट बॉलिंग स्टाईलमुळे तो हिट झाला. विसाव्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करून त्याने आपल्या कामगिरीच्या बळावर लवकरच राष्ट्रीय संघात पण स्थान निर्माण केले.

सुरुवातीच्या काळात अनेक खेळाडूंबद्दल भविष्यातील अंदाज व्यक्त केले जात असतात. बुमराहबद्दल व्यक्त केला गेलेला अंदाज म्हणजे याची बॉलिंग स्टाईल जखमांना आमंत्रण देणारी ठरेल आणि त्यामुळे तो जास्त काळ संघात तग धरू शकणार नाही,. त्याला जखमा तर झाल्या पण तो संघातून बाहेर फेकला जाईल हे काही झाले नाही. उलट तो आज संघाचा महत्वाचा खेळाडू आहे.

बुमराहच्या बॉलिंग स्टाईलबद्दल बोलत असताना मात्र ही स्टाईल त्याची खूप जुनी आहे असे समजू नका. सध्या त्याचा एक जुना व्हिडीओ वायरल झाला आहे. हा व्हिडीओ बुमराह जेव्हा अंडर १९ संघात खेळत होता तेव्हाचा आहे. हा व्हिडीओ बघितला तर हा बॉलर बुमराह आहे हे कोणीही सांगणार नाही.

बुमराहची आजची बॉलिंग स्टाईल आणि त्याची तेव्हाची स्टाईल यात मोठा फरक दिसून येईल. त्याने नेमकी ही स्टाईल बॉलिंगसाठी का निवडली याचे उत्तर त्यालाच माहीत. पण एक गोड निश्चित आहे ती म्हणजे जेव्हा एखादा खेळाडू आपली बॉलिंग स्टाईल बदलतो तेव्हा त्याने मोठा विचार आणि सराव केलेला असतो. म्हणूनच कदाचित तो या बॉलिंग स्टाईलने विकेट्स मिळवत असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required