computer

रोहित आणि विराट या आजीबाईंचा आशीर्वाद घ्यायला का गेले होते ?? कोण आहेत या आजीबाई ??

वर्ल्डकप आता ऐन बहरात आलेला आहे. सेमी फ़ायनलच्या टिम्स जवळपास निश्चित झाल्या आहेत. भारताचे पण सेमी फाइनलचे टिकिट फायनल झाले आहे. मंडळी कालची मॅच हरलो असतो तर मात्र भारताचे टिकिट धोक्यात आले असते राव!! अश्यावेळी आपल्या टीमला चीयर करण्यासाठी देश विदेशातून फॅन आले होते. यात काही वयस्कर फॅन पण होते. अशाच वयस्कर मंडळींमध्ये एक नव्वदितल्या आजीबाई पण होत्या.

मॅच सूरु असताना सगळीकडे या आजीबाईंचाच जलवा होता. जोरजोरात भोंगे वाजवत आणि झेंडा फडकवत आपल्या टीमला आजीबाई चीयरअप करत होत्या. आता तर भारताच्या विजयापेक्षा आजीबाईंच्याच जास्त चर्चा होत आहेत राव!!

मंडळी, या आजीबाईंचे नाव “चारुलता पटेल” असे आहे. त्यांच्यासाठी क्रिकेट म्हणजे जीव की प्राण आहे. त्या तरुणपणापासून क्रिकेट पाहत आल्या आहेत. आजीबाईंनी आपल्या क्रिकेटवेडाबद्दल सांगितलं की, “जोवर नोकरीला होते तोवर टीव्हीवर मॅच पाहायचे, पण रिटायर झाल्यानंतर मात्र ग्राउंडवर येऊन लाईव्ह मॅच पाहत आहे.” भारतात लोकं क्रिकेटला धर्म मानतात असे लोकं उगीच नाही म्हणतात राव!!

मंडळी, महत्वाची बाब म्हणजे या आजीबाईं 1983 साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या वर्ल्डकप विजयाच्या साक्षीदार आहेत. ही गोष्ट त्यांनी स्वतः सांगितली आहे राव!! ग्राउंडवर आजीबाईं दिसली आणि कॅमेरामॅनला मोह आवरता येईना तो परत परत कॅमेरा आजीबाईंवर घेऊन जायचा. ज्याने आजीबाई बऱ्याच वेळा टीव्हीवर दिसल्या. खरी चर्चा तर तेव्हा सुरू झाली जेव्हा कॅप्टन विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा यांनी सुद्धा आजीबाईंचा आशीर्वाद घेतला.

मंडळी, या आजीबाईं जेव्हा वर्ल्डकप सुद्धा व्हायचे नाही तेव्हापासून क्रिकेट पाहत आहेत. पहिला वर्ल्डकप झाला त्याच्या आठवणी सुद्धा आजीबाईं सांगतात. आजवर झालेल्या सगळ्या वर्ल्डकपची साक्षीदार कदाचित ही आजीबाई एकटीच असेल. आजवरच्या सगळ्या वर्ल्डकपमधील सर्वात आवडता प्लेयर कोण? असे विचारल्यावर आजीबाईं मात्र विराट कोहलीचे नाव सांगते. आपण कोहलीचे खूप मोठे फॅन आहोत असे पण आजीबाईं म्हणाल्या. आजवर कोहली सारखा परफेकट प्लेयर झालाच नाही असा सुद्धा आजीबाईंचा दावा आहे!!

मंडळी, आजवर आपल्या देशात खूप सारे क्रिकेट फॅन बघितले. रात्र रात्र सायकल चालवून क्रिकेट बघायला जाणारे, सचिन साठी जगभर फिरणारा सचिनचा फॅन. यात आता आजीबाईंची भर पडली आहे. 1983 वर्ल्डकप विजयाची साक्षीदार असलेली आजीबाईं 2019 च्या भारताच्या वर्ल्डकप विजयाची पण साक्षीदार असो आणि आजीबाईंला दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा...

सबस्क्राईब करा

* indicates required