व्हिडिओ ऑफ द डे : क्रिकेटप्रेमींनो, विराटच्या फिल्डिंगची जादू पाहिली की नाही?

विराट कोहली नेहमीच आपल्या बॅटिंगच्या जोरावर खिळवून ठेवतो, पण आज त्याने आपल्या फिल्डिंगने लोकांची वाह वाह मिळवली आहे. हा पाहा विराट कोहलीच्या फिल्डिंगचा दमदार व्हिडीओ.
Virat Kohli, you beauty. What an effort to run out Nicholls.#NZvsIND pic.twitter.com/pMW0vrx33X
— Aasif/આસિફ (@Bhot_Haard) February 5, 2020
काल ५ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होता. हा सामना भारत हरला असला तरी विराटने हेन्री निकोलसला रनआउट केल्याचा क्षण सर्वांसाठी खास ठरला. यावेळी जसप्रीत बुमरा बॉलिंग करत होता आणि रोस टेलर स्ट्राईकवर होता. रोस टेलरने जसप्रीतच्या मंद गतीच्या बॉलला चुकवून धावा काढण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नात विराट कोहलीच्या हाती बॉल लागला. पुढे काय घडलं हे तुम्ही पाहतच आहात. विराटने विजेच्या चपळाईने हेन्री निकोलसची घोडदौड थांबवली.
या सामन्यात भारताने ३४७ धावांचं मोठं आव्हान उभं केलं होतं. विराटने ६ चौकार मारून एकूण ५१ धावा मिळवल्या होत्या. भारताने हा सामना पूर्ण ताकदीनिशी खेळला असला तरी न्यूझीलंडकडून ४ धावांनी पराभव पत्करावा लागला.
हा सामना विराटच्या चाहत्यांसाठी नेहमीच लक्षात राहील हे मात्र नक्की.