f
computer

आपल्या या १० हिरो-हिरॉईनने खाल्लीय जेलची हवा...कुणाला सर्वात जास्त शिक्षा व्हायला हवी होती असं तुम्हांला वाटतं ??

मंडळी, कालच जोधपुर न्यायालयाने सलमान भाईजानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावली. कालची रात्र ही त्याची जेल मधली पहिली रात्र सुद्धा होती. त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

सलमान खान हा त्याच्या फिल्म्स बरोबर त्याच्या गुन्ह्यांमुळे सुद्धा चर्चेत असतो. पण गुन्हा करून जेलची हवा खाणारा तो एकटाच नव्हे राव. त्याच्या सारखे आणखीही काही फिल्म्स स्टार्स आहेत ज्यांनी जेल मध्ये जावं लागलं आहे.

चला तर आज बघुयात ते १० फिल्म स्टार्स ज्यांना जेल झाली होती.

१. इंदर कुमार

बलात्काराच्या गुन्ह्याखाली इंदर कुमारला अटक आणि जेल झाली होती. २०१७ साली त्याचा मृत्यू झाला.

२. जॉन अब्राहम

जॉन भाऊने सलमान सारखीच सुस्साट गाडी चालवून २ माणसांना धडक दिली होती. त्यानिमित्ताने त्याला जेल मध्ये जावं लागलं.

३. शायनी आहुजा

मोलकरणीवरील बलात्काराच्या गुन्ह्याखाली शायनी अहुजाला अटक आणि तुरुंगवास झाला होता. शायनी अहुजाचं हे प्रकरण त्यावेळी प्रचंड गाजलं होतं.

४. फरदीन खान

अंमलीपदार्थांसह रंगे हात पकडले गेल्याने फरदीन खान वर गुन्हा दाखल झाला होता.

५. सैफ आली खान

तैमुरच्या बाबांनी आपल्या कार ने एका माणसाला उडवलं होतं. त्यानिमित्ताने त्यांचही जेल पाहून झालंय.

६. अक्षय कुमार

ट्विंकल खन्नाने एका शो मध्ये अक्षय कुमारच्या सोबत जे आक्षेपार्ह कृत्य केलं त्याने अक्षयला जेल झाली होती. ट्विंकलने काय केलं होतं ते तुम्ही फोटो मध्ये पाहूच शकता.

७. सुनील शेट्टी

सुनील शेट्टीचं जेल मध्ये जाण्याचं कारण होतं चेक बाउन्स प्रकरण. हुंडाय टेलीकॉमच्या डायरेक्टर पदी असताना त्याच्यावर १० लाख रुपयांचा चेक बाउन्स केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

८. मोनिका बेदी

अबू सालेमची गर्लफ्रेंड असलेल्या मोनिका बेदीला पोर्तुगल मध्ये अबू सालेम सोबत अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी भारतात झाली.

९. संजय दत्त

अबू सलामे आणि दाउदच्या इतर माणसांनी दिलेली AK-56 रायफल आपल्या घरात लपवण्याच्या प्रकरणात संजय दत्तला अटक झाली होती. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात त्याच नाव घेतलं जातं.

 

आणखी वाचा :

ब्लॅक फ्रायडे : १२ मार्च १९९३ रोजी नेमकं काय घडलं होतं ?...जाणून घ्या महत्वाचे ८ मुद्दे !!

१०. सलमान खान

अभिनेत्यांनी केलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत सलमान भाई अव्वल क्रमांकावर आहेत. काळवीट शिकार प्रकरण (१९९८) आणि फुटपाथ वरच्या माणसांना गाडीने चिरडण्याचं प्रकरण (२००२) हे गेल्या २० वर्षापासून त्याच्या मागे हात धुवून लागलं आहे. काळवीट शिकार प्रकरणी त्याला कालच जेल मध्ये रात्र काढावी लागली आणि आजच आलेल्या बातमी नुसार त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. म्हणजे आजची रात्रही त्याला जेल मध्येच काढावी लागणार आहे.

मंडळी, गुन्हेगार सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक कायदा हा प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा देतो....बरोबर ना ?

 

आणखी वाचा :

ऑस्कर प्रिटोरियस, मेसी निघाले जेलमध्ये; जगातल्या या सेलेब्रिटींवरती चालले आहेत खटले...