वाघांच्या शिकारीसाठी सरकारने स्वतः दिलं होतं आमंत्रण ? वाचा काय आहे सत्य !!

मंडळी तुम्हाला एक जुनी जाहिरात आठवत असेल ज्यात महेंद्र सिंग धोनी म्हणत असायचा की भारतात फक्त १४११ वाघ उरलेले आहेत. ही जाहिरात होती ‘सेव्ह अवर टायगर’ अभियानाची. भारतात आढळणारा ‘ढाण्या वाघ’ नाहीसा होण्याच्या मार्गावर असताना सरकारतर्फे आणि इतर संस्थांतर्फे महत्वाची पाऊले उचलण्यात आली आणि त्यासाठी लोकांना आवाहन करण्यात आलं. या अभियानाचा मोठा फायदा झाला आणि आज वाघांची संख्या ३००० च्या घरात आहे.

स्रोत

मंडळी, सरकार तर्फे वाघांना वाचवण्याची माहीम सुरु झाली त्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे पण तुम्हाला माहित आहे का वाघांची संख्या कमी होण्यात आपल्या सरकारचाच मोठा हातभार आहे ? कसा ? चला समजून घेऊया.

वाघांची संख्या कमी होण्यात पर्यावरणाचा ऱ्हास आणि जंगलतोड अशी कारणं दिली जातात. ती बरोबरही आहेत पण त्याचबरोबर सरकारने दिलेली १९६० ची जाहिरात सुद्धा कारणीभूत आहे. या जाहिरातीचं नाव होतं “शिकार”.

स्रोत

परदेशी पर्यटकांना भारतात येऊन शिकारीचा आनंद लुटण्यासाठी दिलेलं आमंत्रण म्हणजे “शिकार”. ही शिकार होती चक्क आपल्या राष्ट्रीय प्राण्याची. वरील फोटो मध्ये तुम्ही ती जाहिरात बघू शकता. या जाहिरातीत स्पष्टपणे लिहिलं आहे की ‘शिकार’ हा एक खेळ असून हा खेळ साधा नव्हे. तो राजा महाराजांचा खेळ आहे.

‘नोकरचाकर, प्रशिक्षित शिकारी आणि मोठ्या तांड्याबरोबर वाघाची शिकार करण्यासारखा दुसरा रोमांचकारी अनुभव नाही.‘ अशा आशयाचा हा मजकूर छापून आला होता. सरकारी जाहिराती मार्फत शिकारीची एवढी प्रशंसा झाली होती हे बघून विश्वास बसत नाही ना ? पण ही खरी बातमी आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याचा हा सर्वात धोकादायक मार्ग ठरला.

स्रोत

पुढे जाऊन वाघांची संख्या कमी होऊ लागली. १९७०-७३ च्या काळात भारत सरकारने वाघ वाचवण्याच्या मोहिमेचा प्रारंभ केला पण तो पर्यंत गंभीर नुकसान झालं होतं.