computer

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जीवनातील ११ महत्वाचे टप्पे !!

संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा आणि लोकांना हसवत ठेवूनच अचानक पडद्याआड गेलेला लक्ष्या उर्फ आपले लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज जन्मदिन. लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रेमाने लक्ष्या म्हणून एकेरी नावाने हाक मारावी एवढे ते आपले होते. त्यांच्या अभिनयाने साकार झालेले अनेक सिनेमे आजही आपल्याला सारा थकवा विसरायला लावतात.

मंडळी, आज आपल्या लाडक्या लक्ष्याच्या जन्मदिनानिमित्त बघुयात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बद्दल माहित नसलेल्या ११ गोष्टी.

१. २६ ऑक्टोबर, १९५४ रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म झाला. सुरुवाती पासूनच त्यांचा ओढ अभिनयाकडे होता. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, गिरगावातील सार्वजनिक गणेशोत्सवातून हा कलाकार चमकला. त्यांनी स्पर्धेत अनेक पारितोषिक जिंकली. पुढे त्यांनी आपल्या करीयरची सुरु

२. रंगभूमीवर अभिनय करण्याआधी ते नाटकाचा पडदा ओढण्याचं काम करायचे. पडदा ओढणाऱ्या या पोऱ्याने एके दिवशी संपूर्ण पडदा कधी व्यापला ते समजलंच नाही.

३. बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टूर टूर’ नाटकापासून त्यांनी आपल्या रंगभूमीवरच्या करियरला सुरुवात केली. हे त्याचं पाहिलं नाटक प्रचंड गाजलं. त्यानंतर आलेला ‘शांतेचं कार्टं चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’, ‘कार्टी चालू आहे’ या सारख्या नाटकातून लक्ष्मीका

४. महेश कोठारे आणि सचीन पिळगावकर या दोन्ही कंपन्यांमधून तयार झालेल्या चित्रपटात लक्ष्मीकांत हमखास असायचे. ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवा बनवी’, ‘शेम टू शेम’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’ या सारखे चित्रपट लोकांना प्रचंड आवडले. झपाटलेला चक्क हिंदीत डब झाला आणि तिथेही ल

५. याच काळात लक्ष्या आणि अशोक सराफ जोडी तयार झाली. या जोडीने अनेक चित्रपटात काम केलं आणि ते चित्रपट गाजले सुद्धा. ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘माझा छकुला’, ‘आयत्या घरात घरोबा’ इत्यादी त्याची उदाहरणं. दोघांचं टायमिंग जुळून आलं होतं.

६. मराठी नंतर त्यांना त्याकाळातील बड्या आणि नावाजलेल्या चित्रपट निर्मिती संस्थांमधून ऑफर आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके हें कौन ?’ या यशस्वी चित्रपटांमध्ये लक्ष्य दिसला. सलमान बरोबर त्याने ‘साजन’ सारखा हिट चित्रपट केला.

७. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या शिस्तीबद्दल, दिलदारपणाबद्दल, आणि विनोदाच्या टायमिंग बद्दल अनेकदा बोललं जातं. रात्री कितीही उशिरा झोप लागली तरी हा माणूस सकाळी बरोबर वेळेवर शुटींगसाठी हजार राहायचा. त्यांचा शॉट असेल सहकलाकारांना देखील लवकर यावं लागायचं.

८. त्यांचं लग्न रुही बेर्डे यांच्याशी झालं पण ते फार काळ टिकलं नाही. त्या नंतर त्यांनी प्रिया बेर्डे यांच्याशी लग्न केलं. त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

९. लक्ष्मीकांत बेर्डे हे हिंदी आणि मराठीत गाजत होते पण त्यांची अभिनयक्षमता दिसेल असं काम त्यांना फारसं कधी मिळालंच नाही. ‘एक होता विदुषक’ सारखा गंभीर भूमिका असलेला रोल त्यांना मिळाला पण तो तिकीट बारीवर सडकून आपटला. त्यानंतर त्यांना गंभीर रोल फारसे मिळाले

१०. १६ डिसेंबर, २००४ साली त्यांनी हे जग सोडलं. किडनीच्या आजाराने त्यांनी जगाची निरोप घेतला. त्यांच्या अश्या अकाली मृत्यू कोणीही विचार केला नव्हता.

११. लक्ष्या म्हटलं की विनोदी अभिनेता ही जी त्यांच्यावर छाप पडली ती शेवट पर्यंत निघाली नाही. त्यांच्या ‘एक होता विदुषक’ या सिनेमाच्या अपयशाने ते खचून गेले. आपल्या शेवटच्या काळात ते दारूच्या खूपच आहारी गेले होते. एका मनस्वी कलाकाराची ही शोकांतिकाच म्हणावी ल

अश्या या आपल्या लाडक्या लक्ष्याला बोभाटाची भावपूर्ण आदरांजली !!

 

 

आणखी वाचा :

अशी ही बनवाबनवी मधले किती डायलॉग्ज तुम्हाला तोंडपाठ आहेत, जरा पाहा बरं...

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required