computer

सेन्सॉर बोर्डला आवडणारे काही 'संस्कारी' सिनेमे,..ज्यांच्यावर कधीच बंदी आली नाही !!

आपण काय बघावं आणि बघू नये याची छानपैकी काळजी घेणारे आपले महान सेन्सॉर बोर्ड, हे एका अर्थी पुण्य कर्म करत आहेत. बँडीट क्वीन, ब्लॅक फ्रायडे, फिराक, पांच, अन-फ्रीडम, उडता पंजाब, आत्ताचा लिपस्टिक अंडर माय बुरखा हे असले सिनेमे बघून आपली पिढी बिघडू शकते. लोकांनी कसे छान छान पारिवारिक सिनेमे पाहावेत, या माफक इच्छेतून सेन्सॉर बोर्डने काही संस्कारी सिनेमे काहीही अडचण न येवू देता रिलीज केलेत.

असं आहे मंडळी, ज्या सिनेमांना खरंच बंदी घालायला हवी होती त्या सिनेमांना सेन्सॉर बोर्डने एकही कट न लावता प्रदर्शित केले, पण भारतीय समाजाचा चेहरा उघडपणे दाखवू इच्छिणाऱ्या सिनेमांवर मात्र यांनी बंदी आणली. तर मंडळी आज आपण बघणार आहोत असे काही सिनेमे, ज्यांच्यावर खरं तर बंदी यायला हवी होती.. पण ते बिनदिक्कत प्रदर्शित झाले!!

१. जिस्म २

सर्वात आधी तर या सिनेमाच्या पोस्टरवरूनच वादंग मजला होता. सिनेमातली दृश्य कशी असतील हे आपल्याला माहितीच आहे. यावरून माणसांकडून चित्रपटावर बंदीची मागणी झाली पण तरी सिनेमा प्रदर्शित करण्यात आला.

२. हेट स्टोरी १, २ आणि ३

अश्या चित्रपटांना बघून वाटतं की चित्रपटात कथा सुद्धा असते का ?

३. क्या कूल हैं हम २ आणि ३

'क्या कूल हैं हम' च्या २ दुसऱ्या भागात आपल्या महाराष्ट्राचे 'रितेश देशमुख होते...जे सध्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात महाराजांची भूमिका करत आहेत.

४. मस्तीजादे !

सनीचे भलतेच फॅन आहेत सेन्सॉर बोर्डवाले. तिचा एकही सिनेमा अडवून ठेवत नाहीत. सनीने यात डबल रोल केलंय राव !

५. ग्रँड मस्ती आणि ग्रेट ग्रँड मस्ती

सर्व बोल्ड सिनेमांचे बाप होते हे दोन्ही सिनेमे...अश्लील विनोद, कथेच्या नावाने बोंब आणि अभिनय तर विचारायलाच नको !!

 

 

 

हे सिनेमे पाहून आपल्याला समजलंच असेल की सेन्सॉर बोर्डला आपली किती काळजी आहे !!

सबस्क्राईब करा

* indicates required