सिरीयात बळी पडलेल्या त्या मुलाचं मन हेलावून टाकणारं वाक्य जगभर घुमतंय...!!

सिरियात चालू असलेल्या यादवी युद्धात अनेकांचे बळी गेले, अनेक लोक युरोपकडे जीव पळाले. २०११ पासून या यादवीला सुरुवात झाली. या ना त्या कारणाने सीरियाच्या आजूबाजूच्या अनेक देशांचे हितसंबंध या युद्धात आहेत. सरकार आणि विरोधक यात प्रचंड तणावाचं वातावरण सध्या सिरियात आहे. यातून काय मार्ग निघेल? शांतता कधी नांदेल? हा भविष्याचा भाग आहे..  पण युद्धकाळात जे निरर्थक बळी पडतात त्यांची संख्याही सिरियात कमी नाही.


स्रोत

 


स्रोत

निष्पाप लोकांचे प्राण घेऊन चालेल्या यादवीत एका मुलाने मन हेलावून टाकणारं वाक्य म्हटलं आणि पूर्ण जगाचा थरकाप उडाला. ‘I'm gonna tell God everything’. ‘मी देव बाप्पाला जाऊन सगळं सांगणार आहे’ हे म्हणताना त्या मुलाला काय वाटलं असेल?

स्रोत

वय वर्ष ३, मरणाच्या अगदी दारात असताना त्याने हे वाक्य म्हटलं. फोटोत आपण त्याच्या शरीरावरच्या जखमा बघू शकतो. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण त्याच्या गंभीर जखमांमुळे त्याच्या शरीराने साथ सोडली आणि त्याचा मृत्यू झाला.  पण त्याचे हे शेवटचे वाक्य पूर्ण जगात घुमू लागले. त्याचा रक्ताने माखलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या मुलाचं नाव मात्र कळू शकलेलं नाही.

यामुळे युध्द किती भयानक आहे हे पुन्हा एकदा ठळक झालं. सिरियात अजूनही यादवी चालू आहे आणि ती कधी संपेल याचा काहीच पत्ता लागत नाही.

 

यावर काही प्रश्न !

त्या मुलाने खरचं देवाला सांगितलं असेल तर देव अजून शांत का आहे ?

धर्माच्या नावावर अशांतता पसरवणाऱ्यांना शिक्षा कधी होईल ?

 

अर्थातच सर्वच प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत !!

सबस्क्राईब करा

* indicates required