computer

१३ हॉरर सिनेमे पाहा आणि एक लाख इनाम मिळवा!! कोण कोणाला ही ऑफर देत आहे?

२००८ साली रामगोपाल वर्माचा फूंक हा सिनेमा आला होता. हा सिनेमा जो कोणी थेटरमध्ये एकटा पाहून दाखवेल त्याला थेट ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले होते. आता याच प्रसंगाची आठवण यावी असा नवा प्रसंग घडत आहे. त्यावेळी ज्यांना संधी साधता आली नाही त्यांना आता चान्स आहे.

फायनान्सबज नावाची लोकांना आर्थिक सल्ले देणारी वेबसाईट आहे. या मंडळींना शोध घ्यायचा आहे की हाय बजेट हॉरर सिनेमे आणि लो बजेट हॉरर सिनेमे यांपैकी कोणते सिनेमे लोकांना जास्त घाबरवू शकतात. यासाठी त्यांनी भन्नाट स्कीम आणली आहे.
 

त्यांनी त्यांचे १३ असे सिनेमे निवडले आहेत जे पाहताना कुणीही प्रचंड घाबरेल.

गेट आउट

द पर्ज

पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी

इंसीडियस

द ब्लेयर विच प्रोजेक्ट

सिनिस्टर

ए क्वाईट प्लेस

ए क्वाईट प्लेस २

कँडीमॅन

हॅलोविन

सॉ

ऍनाबेल

द ऍमीटीविले हॉरर

अशा सिनेमांचा यात समावेश आहे. हे सर्व सिनेमे पुढील महिन्यात ९ ते १८ ऑक्टोबर या १४ दिवसांच्या काळात बघायचे आहेत.

हे १३ सिनेमे जो पाहू शकेल त्या व्यक्तीला तब्बल एक लाख रुपये इनाम ही कंपनी देणार आहे. सोबतच जवळपास ३५०० रुपयांचे गिफ्टकार्ड असेल. पण अजून खूश होऊ नका. सिनेमे पाहत असताना फिटबिट डिव्हाईसच्या मदतीने हृदयाचे ठोके चेक केले जाणार आहेत. त्यानंतर बक्षीस देण्याचे निश्चित केले जाईल.

याच कामासाठी फायनान्सबज ही वेबसाइट हॉरर मुव्ही हार्ट अनॅलिस्टच्या शोधात आहे. पण यासाठी वयाची अट ही १८ वर्षांपेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे, तर अमेरिकेत वास्तव्य असणारी व्यक्तीच यात सहभागी होऊ शकणार आहे. २६ सप्टेंबरपासून यात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required