computer

कोरोना विषाणूंबद्दल सीआयडीच्या एसीपी प्रद्युम्नना दहा वर्षांपूर्वी जे माहीती होतं ते अमेरीकेला आत्ता कळतंय !!

कोरोनाचं संकट जगभर फोफावल्यानंतर २०११ साली आलेल्या ‘कंटेजन’ (Contagion) या सिनेमाची जगभर चर्चा झाली. सिनेमातल्या कथानकात कोरोनासारख्याच एका विषाणूचा जगभर संसर्ग होतो. त्याची लक्षणे बहुतांश कोरोनाशी मिळतीजुळती असल्याने कंटेजनमधून कोरोनाबाबत भविष्यवाणी झाल्याचं सगळीकडे  म्हटलं जाऊ लागलं होतं. फक्त कंटेजन सिनेमाच नाही तर Dean Koontz या लेखकाने लिहिलेल्या १९८१ सालच्या कादंबरीतही वूहान नावाच्या एका विषाणूचा उल्लेख आढळतो. 
 

हा फक्त योगायोग आहे की आणखी काही हे तुम्हीच ठरवा. आज आम्ही या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे आपल्या आवडत्या सीआयडी मालिकेच्या एका भागात कोरोनासारख्या विषाणूचा उल्लेख आहे. या भागाचं नावच होतं ‘खतरनाक व्हायरस का रहास्य’.

२०१३ साली २५ आणि २६ जानेवारी या दोन दिवसात दोन एपिसोड्समध्ये ही गोष्ट सांगण्यात आली होती. एपिसोडच्या सुरुवातीच्या घोषणेत एका नवीन विषाणूचा उल्लेख होता. त्या घोषणेनुसार हा विषाणू आजवर माणसाने कधीही पाहिला नसलेला विषाणू आहे. तो आगीसारखा पसरतो आणि लाखो माणसांना त्याचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यावर फक्त एकच उपाय आहे. तो म्हणेज मृत्यू. हा विषाणू खोकला, शिंका किंवा हात मिळवल्याने पसरतो. 

हे वर्णन वाचून कोरोनाची वैशिष्ट्ये नक्कीच आठवली असतील. चला तर मला हे दोन्ही एपिसोड पाहून घ्या. खाली लिंक देत आहोत.

(लिंक)

भाग १

भाग २

सबस्क्राईब करा

* indicates required