computer

दृष्टीभ्रम- बायको दिसली की सासू?

इंटरनेटवर ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच दृष्टीभ्रम नावाचा प्रकार चांगलाच हिट असतो. इथे काय असते की एक गोष्टी प्रत्येकाला जरा वेगळीच दिसत असते. मग ज्याला जशी ती गोष्ट दिसली त्यावरून मग त्याच्या स्वभावाबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल अंदाज लावला जात असतो. आता यात खरेखोटे किती असा पण प्रश्न असतो, पण काही ऑप्टिकल इल्युजन मात्र तज्ञानी बनवलेले असतात.

आज आपण असेच एक ऑप्टिकल इल्युजन (दृष्टीभ्रम) बघणार आहोत. आता हा फोटो बघा यात तुम्हाला काय दिसत आहे? एक वयस्कर बाई की तरुण मुलगी? २०१८ साली ऑस्ट्रेलियातील फ्लिडर्स विद्यापीठातील दोन प्राध्यापकांनी केलेल्या अभ्यासानुसार वय झालेल्या लोकांना वयस्कर बाई यात दिसते. तर कमी वय असलेल्या लोकांना तरुण मुलगी दिसते.

हा फोटोला बायको की सासू असे नाव देण्यात आले आहे. १८ ते ६८ वयातील ३९३ लोकांमध्ये हा अभ्यास घेण्यात आला. फोटो बघितल्याबरोबर आधी कोण दिसते हे त्यांना विचारण्यात आले होते. या रिसर्चमध्ये सहभागी असलेले माईक निकोलस म्हणतात की, "तरुण लोकांना तरुणी दिसली तर वयस्कर लोकांना वय झालेली स्त्री."

तर मग तुम्ही अजूनही हा फोटो बघत आहात का? तुम्हाला काय दिसले? वयस्कर बाईचे नाक हे तरुण मुलीची दाढी आहे. तर वयस्कर बाईचे डोळे हे तरुण मुलीचे कान आहेत. तर आता तुम्हाला या फोटोचा नेमका उलगडा झाला असेल.
आता सासू की बायको तुमच्या वयाप्रमाणे दिसली की कसे हे ही सांगून टाका!!

सबस्क्राईब करा

* indicates required