मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

आला 'डॅडी' चा फर्स्ट टिझर : फुल्ल डेंजर दिसतोय अरूण गवळी

1 मिनिट वाचन
शेअर करा:
आला 'डॅडी' चा फर्स्ट टिझर : फुल्ल डेंजर दिसतोय अरूण गवळी

७०-८० च्या दशकापासून मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा निर्माण करून राहीलेल्या अरूण गवळीच्या जीवनावर "डॅडी" नावाचा नवा चित्रपट येऊ घातलाय...

             चित्रपटात अरूण गवळीच्या भुमिकेत अर्जुन रामपाल काम करतोय. आणि नुकताच या चित्रपटाचा पहिला टिझर लॉन्च झाला. टीझरमध्ये अर्जुन रामपालनं अरूण गवळीच्या भूमिकेवर कमालीची मेहनत घेतल्याचं दिसतंय. यात पोलीस अधिकाऱ्याला शांत आणि खुनशी आवाजात उत्तर देणारा अरूण गवळी दिसतोय.  सोबतच्या दृश्यांतून त्यावेळचा तो जुना काळही इथे जसाच्या तसा उभा केला गेलाय हे दिसून येतंय. 

स्त्रोत

              पण नेहमीप्रमाणे इथेही हा चित्रपट भाषेत मार खातो की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण मन्या सुर्वेचा जसा मनीया सुर्वे झाला होता तसाच इथे गवळी ऐवजी "गावली" झालाय. भाषेवरचं दुर्लक्ष सोडलं तर बाकी टिझर पाहून मात्र असंच वाटतं की हा चित्रपट अपेक्षांना खरा उतरेल. यात सरप्राईज पॅकेज म्हणुन दाऊदच्या भूमिकेत फरहान अख्तर दिसू शकतो हेही विसरू नका...

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'जिंकू किंवा मरू'चा जयघोष आणि 'छोटा जवान': जेव्हा नागरिक सैनिक बनला!
मनोरंजन

'जिंकू किंवा मरू'चा जयघोष आणि 'छोटा जवान': जेव्हा नागरिक सैनिक बनला!

भारत-चीन युद्धानंतर देशवासीयांचे मनोधैर्य उंचावणारा 'छोटा जवान' चित्रपट आणि बालकलाकार सचिन-महेश कोठारे.

१५ ऑगस्ट, २०२६

‘देव माझा निळानिळा...’ आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वराची जादू!
मनोरंजन

‘देव माझा निळानिळा...’ आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वराची जादू!

वसंत बापटांचे शब्द, भानुकांत लुकतुकेंचे संगीत आणि सुषमा श्रेष्ठ यांचा निरागस स्वर; जाणून घ्या एका अजरामर बालगीताची गोष्ट.

२८ सप्टेंबर, २०२६

अंकल पै : चित्रांच्या चौकटीतून भारताची गोष्ट सांगणारा माणूस
मनोरंजन

अंकल पै : चित्रांच्या चौकटीतून भारताची गोष्ट सांगणारा माणूस

अमर चित्र कथांच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या भारतीय मुलांना इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणारे लाडके 'अंकल पै' म्हणजेच अनंत पै.

१७ सप्टेंबर, २०२६