म्हणून आज ४ डिसेंबरला भारतीय नेव्ही दिन साजरा केला जातो…

भारतीय नौदल हे जगातल्या सर्वोत्कृष्ट नौदलांपैकी एक आहे. पण हा दबदबा काही एका दिवसात तयार झालेला नाही.  गेल्या सात दशकातल्या आपल्या कामगिरीमुळेच शत्रूंच्या पोटात गोळा आणण्याची ताकद आपल्या नौदलाला मिळाली आहे. दरवर्षी भारत ४ डिसेंबर १९७१ ला मिळवलेल्या विजय साजरा करणे आणि शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून नेव्ही दिवस म्हणून साजरा करतो.  या दिवशी भारताने भारत-पाकिस्तान युद्धात  ऑपरेशन ट्रायडंट यशस्वीरित्या पार पाडले होते.  

काय आहे ऑपरेशन ट्रायडंट?

४ डिसेंबर १९७१च्या रात्री भारतीय नौदलानं पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केला, या हल्ल्यात आपल्या नौदलाने तुफानी हल्ला चढवत पाकिस्तानी नौदलाचं प्रचंड मोठं नुकसान केलं. त्यात पाकिस्तानी युद्धनौका, कराची बंदरातील तेलसाठा यासोबतच साधारण ५०० पाकिस्तानी नौसैनिकांना जखमी केलं. या कामगिरीत भारतीय नौदलाच्या आय. एन. एस. निपट, आय. एन. एस. निराघट आणि आय. एन. एस. वीर या मिसाईल वाहक नौकांनी मोठी भूमिका बजावली. या ऑपरेशनमध्ये पहिल्यांदाच  अरबी समुद्रामध्ये  अँटी शिप मिसाईलचा वापर करण्यात आला होता.

तर आज या विजयाच्या आनंदात आपण भारतीय नेव्ही डे साजरा करूयात आणि आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या नौसैनिकांना सॅल्यूट करूयात.

सबस्क्राईब करा

* indicates required