computer

केबीसीत भाग घेणारे रेल्वे कर्मचारी पांडेजी सरकारी कार्यालयीन अडचणीत !!

कौन बनेगा करोडपती हा टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय शो आहे. अमिताभ बच्चन, फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट, हॉट सीट यासगळ्यांबद्दल लोकांना जाम उत्सुकता असते. आताशा याची क्रेझ काहीशी कमी झाली असली तरी एकेकाळी केबीसीमध्ये सहभागी होता यावं म्हणून लोक फोनला चिकटून बसलेले असत. थोडक्यात, केबीसीमधील हॉट सीटवर बसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. ज्यांची ही इच्छा पूर्ण होते ते किती नशीबवान असे समजणारे लोकही काही कमी नाहीत.

पण एका रेल्वे कर्मचाऱ्याला केबीसीत सहभागी होणे चांगलेच जड जाईल असे दिसत आहे. शुक्रवारी दाखवण्यात आलेल्या एपिसोडमध्ये कोटा, राजस्थान येथे कार्यरत असलेले देशबंधू पांडे हे केबीसीमध्ये सहभागी झाले होते. पहिले १० प्रश्नांचे उत्तरे बरोबर दिल्यावर त्यांना ३ लाख २० हजार रुपयेही मिळाले

आता तुम्ही म्हणाल या सर्वात चुकीचे काय? तर या पांडे महाशयांनी ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान आपल्याला सुट्टी मिळावी असा अर्ज दिला होता. पण त्यांच्या वरिष्ठांनी त्यावर काहीही निर्णय घेतला नाही तरी पांडे मुंबई निघून गेले.

 

पांडेजी परतले तेव्हा खुशीत होते. पण परतल्यावर त्यांच्या हातात चार्जशीट ठेवण्यात आली. एवढंच नाही, तर त्यांची तीन वर्ष इंक्रिमेंट पण रोखण्यात आली. आता त्यांच्या बाजूने रेल्वे कर्मचारी एकवटले आहेत. पण पांडे काय मीडियासमोर बोलायला तयार नाहीत. आता पुढे काय होते ते कळेलच..

सबस्क्राईब करा

* indicates required