अतरंगी, भन्नाट, सैराट, नादखुळा, काटाकिर्रर्र...काय म्हणाला या फोटोंना ??

मंडळी, भारतीय लोक जगात खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. पण त्यांचे सगळेच जगजाहीर नाहीयेत. आज आम्ही काही भारतीयांच्या भन्नाट डोकॅलिटीचे काही नमुने तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. आता सगळ्यांना आमचं म्हणणं काही पटणार नाही आणि त्यांना फिस्सकन हसू येईल ते सोडा.. पण अशा या अफलातून गोष्टी तुम्हांला जगात कुठेच इतर ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत..
पार्श्व आकर्षण

लोकांना कसलीकसली आकर्षणं असू शकतात हे काही सांगता यायचं नाही. हे टाळलं नाही तर काय होऊ शकतं हे अगदी उदाहरणासह चित्र काढून दाखवलंय. म्हणजे वाचता न येणाऱ्याला पण अर्थ कळला पाहिजे.. काय??
किती लिटर दूध हवं?

हा फोटो आम्हांला व्हॉटसॲपवरुन मिळालाय. आता तो जयंत नारळीकरांच्या नावावर खपवला जात असला तरी खरोखर त्यांच्याच घराबाहेरचा आहे का याबद्दल काही खात्री नाही. हो, पण हा पुण्यातला आहे एवढं मात्र नक्की!! पण थोडा विचार करा, किती दूध हवे यासाठी गवळ्याची वाट पाहा आणि मग दूध घ्या, हे करण्यापेक्षा किमान शब्दांत कमाल संदेश पोचवणारी ही सिस्टीम कसली भारी आहे. बघा, तुम्हांला पण तुमच्या गवळ्याला किती लिटर किंवा किती पिशव्या दूध द्यायच्या हे सांगायला हे घड्याळ उपयोगी पडेल.
हनिमून हो भौ हनिमून..

आता पाट्या ही काही फक्त पुणेकरांची मक्तेदारी आहे का? तर आपल्या या भावड्यानं पण नीट बोर्ड लावलाय की तो 'हनिमूनला गेल्यामुळं दुकान बंद हाये..'
पण आपल्यातले कितीजण खरोखर हनिमून हा शब्द वापरतात आणि कितीजण लग्नानंतर फिरायला गेलो होतो म्हणतात?? सांगा सांगा..
अगली बॉयफ्रेंड..

हा फोटो आहे जेसलमेरच्या किल्ल्याबाहेरच्या एका दुकानाचा. हे सगळं तर जाऊंदेच, पण यातला एकही आयटेम अंगावर घालायला कुठला बॉयफ्रेंड राजी होईल असं काही आम्हांला वाटत नाही. उलट घातल्यावर आधीचा बरा असलेला बॉयफ्रेंड अगली होईल असंच वाटतं. तुमचं काय मत आहे??
अब जीमण की तैयारी करो..

हे राजस्थानातल्याच एका घरावर रंगवलेलं आढळलं. यांच्या शेजारच्या घराचं नांव होतं लव्ह लॉयन की हवेली.. म्हणे तिच्या मालकाचं नांव- प्रेम सिंह होतं.. लव्ह लायन की जै!!
कसं अगदी परसाकडं असल्यासारखं वाटेल नै??

आता एखाद्याला मस्त शेतात बसून, आजूबाजूचं निसर्गसौंदर्य पाहात 'उद्योग' आटपायची सवय असेल. तशी सोय त्यानं शहरात आल्यावर पण करुन घेतली तर काय बिघडलं?
घाबरु नका, हा फक्त पेपर आहे, तुमचं सामूहिक शिरकाण नाही

या पेपरमधल्या सगळ्याच सूचना वाचनीय आहेत. शेवटची तर लै भारी..
पाणी, जुलाब आणि रात्री १२ नंतर येणारी भुतं..

या ग्रामपंचायतीत लै थोर लोक दिसत्यात.. मेसेज बरोबर आहे, पन तो कसला 'चाबूक' पद्धतीनं सांगितलाय.
त्या कवितेच्या वरती कुणालातरी रात्री १२ नंतर फेसबुक आणि व्हॉटसॲपची भुतं पण दिसायलेत राव!!
दाढी समारंभ..

अहो, हसू नका. खरंच असा काही समारंभ असतो म्हणे.
हाफ साडी समारंभ..
मुलांचा दाढी समारंभ तितकासा ऐकिवात नाही, अप्ण दक्षिणेत या हाफ साडीचं लैच महत्त्व आहे राजेहो. ही चित्रातली जिलेबी आम्हालापण कळत नाही, पण हे मुलीच्या हाफ साडी समारंभाचं आमंत्रण पोस्टर आहे एवढं नक्की माहित आहे. हाफ साडी समारंभ म्हजे काय? अवो, मुलीला पदर आला की करायचं ते फंक्शन. आता 'पदर येणं' म्हंजे काय ते आम्हाला नका विचारु. आता आपल्याकडे पण पूर्वीच्या काळी हे पदर येणं साजरं व्हायचं, पण आता तीए प्रथा राह्यल्याचं जास्त कुठे दिसत नाही.
पान खाल्ल्यास जीभेसोबत गालही लाल..

काय भारी ऑफर आहे ना राव? पूर्वी अशा पाट्या फक्त पुण्यात दिसायच्या. आता बहुतेक पुणेकर सगळीकडे स्थंलांतरीत झाले.
एकबार इस्तेमाल करें, फिर विश्वास करें..

आपण आताच्या जाहिराती अतिशयोक्त आहेत असं म्हणतो, पण मग या ॲडव्हर्टाईजला काय म्हणावं? नशीब त्यांनी तिरडीची जाहिरात नाही केलीय.
रोकठोक मामला..

मराठवाड्यात एक आडस नावाचं गांव आहे. हे तिकिट तिथलं असावं का?
हे नक्की आपल्या रोसेशने लिहिलं असणार..

बटाटा आणि टोमॅटो ३० वर्षं एकत्र राह्यले की त्यांचं फ्रेंच फ्राईज आणि केचप होतं राव. आजवर माहित नव्हतं ना हे तुम्हांला?
कॉपी नका करु..

बघा, त्यांना तुमच्याबद्दल किती कळकळ आहे.
काय बिशाद आहे नवऱ्याची चुकायची?

मंडळी, हे नवरे लोक घरकाम सांगितलं की असं काम करतात, की पुन्हा त्यांना कुणी काम सांगणार नाही. पण मिळालाच ना ठकास महाठक !!
आणखी वाचा :
टीचर आहे की डाकू ?

इंग्लिश एका फटक्यात शिकवण्याची एवढी चांगली हमी अजून पर्यंत कोणी दिली नसेल.
असं कधी नाव असतंय का ??

आता तर 'जिओ अनलिमिटेड' आलाय. 'मिस्काल' चा जमाना गेला राव !!
आणखी वाचा :
अजब गजब गाव : या गावात गुगल, ओबामा, सोनिया गांधी, शाहरुख खान हे सगळे एकत्र राहतात !!
या लेखातले बरेचसे फोटोज आम्हांला व्हॉटसॲप फॉरवर्ड्स मधून मिळालेत. त्यासाठी आम्ही त्या सर्व "आला फॉर्वड की ढकल" मंडळींचे भारी आभारी अहोत. मंडळी, तुम्हांलाही असे विनोदी फोटो फॉर्वर्ड केले किंवा तुम्ही स्वत:च काढले, तर आमच्यासोबत ते शेअर करा...