अशी वाणसामानाची यादी फक्त पुणेरी बायकोच देऊ शकते..

त्याचं काय आहे, पुरूषांना बाजारात पाठवायचं म्हणजे एक कटकटच असते. सांगितलेली गोष्ट धड  घेऊन येतीलच याची काही खात्री नसते..
मैं बोली के लाना, तू इमली का दाना
मगर वो छुहारे ले आया दिवाना ||
मैं बोली की मचले, है दिल मेरा हाय
वो खरबुजा लाया जो नीम्बू मँगाये||

अशी परिस्थिती तर नेहमीचीच.

यावर तोडगा काढणार नाही ती बायको कसली!! आणि त्यातच जर ती पुणेरी असेल तर काही बोलायलाच नको. 
तर, पुण्याच्या इरा लोंढे-गोळवलकर हिने तर नवऱ्यासाठी भाजी खरेदीसाठी एक मार्गदर्शक पत्रिकाच तयार केली.  गेल्या आठवड्यात ती तुम्ही व्हॉटसॲपवर वाचली असेलच.

आता पब्लिक डिमांडनुसार इराने "असंच का?" याची उत्तरंही दिली आहेत. म्हणजे उभट कांद्याची वाढ अजून होतच असते, म्हणून थोडा बसका आणि गोल कांदा घ्यावा, तसंच कमी उंचीच्या पण भरपूर पानं असलेल्या मेथीवर खतांचा कमी मारा झालेला असतो इत्यादी इत्यादी. आहे का आता काही बिशाद शिकलेल्या मुलींना इतर गोष्टींची माहिती नसते म्हणण्याची??

काही म्हणा, या यादीनं इरा आणि तिचा नवरा गौरव यांना चांगलीच प्रसिद्धी दिलीय हो..

सबस्क्राईब करा

* indicates required