computer

आज आमच्याकडे हसायला या !

वर दिलेले व्यंगचित्र बघून तुम्ही हसलाच असाल याची आम्हाला खात्री आहे.बोभाटावर वर्षभरात आम्ही  बरेच नवनवे प्रयोग करत असतो.या प्रयोगात व्यंगचित्रांची कमतरता कायम वाटत होती.आमचे अनेक मित्र चित्रकार छायाचित्रकार आहेत पण व्यंगचित्रकार नाहीत.गेले काही दिवस  ही पोकळी भरून काढण्यासाठी आमच्या संग्रहातल्या व्यंगचित्रांना मराठी 'टच' देण्याचा आमचा प्रयोग चालू आहे.या कलाकृती साधारण १९५५ ते ६०च्या  इंग्रजी मासीकातून घेतलेल्या आहेत.प्रयोग असा आहे की जुने व्यंगचित्र नवीन चित्रकारानी परत तयार करावे.जुने गाणे जसे नव्या आवाजात रेकॉर्ड करतात तसेच.असे नाही केले तर ही व्यंगचित्रे मराठी वाचकांपर्यंत कधीच पोहोचणार नाहीत. तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघत आहोत.

दलाल स्ट्रीट आणि शेअरबाजार म्हटले की मनात आपण लुबाडले तर जाणार नाही ना असा भयगंड मनात असतोच.. हे भय सर्वकालीन आहे. १९५५च्या या व्यंगचित्रात शेअरबाजारात घेऊन जाणारा टॅक्सीवाला कसा दिसत असेल हे सांगणारे हे व्यंगचित्र बघा !
 

सध्या अनेक लोक तुरुंगात जात आहेत.बेलवर सुटण्याची वाट बघत आहेत. या बातम्या सतत टिव्हीवर बघून लहान मुलांचे खेळ पण बदलत असतील हे सांगणारे हे व्यंगचित्र बघा !

सबस्क्राईब करा

* indicates required