पडद्यामागची गोष्ट - सिनेमातील 'फॉले' हा काय प्रकार असतो भाऊ ? पहा व्हिडीओ...

मंडळी, सिनेमा जर इंग्रजी असेल तर त्याला ‘डबिंग’ करून म्हणजे इंग्रजी आवाजाच्या जागी हिंदी आवाज लावून प्रदर्शित केला जातो. यामुळे इंग्रजी न कळणाऱ्यां लोकांना देखील तो सिनेमा समजू शकतो. ताजं उदाहरण म्हणजे बाहुबली सिनेमा तमिळ असूनही त्याला अश्या कुशलतेने हिंदी मध्ये डब करण्यात आले की तो सिनेमा दाक्षिणात्य आहे हे आपण विसरून गेलो.

राव, सिनेमा दुसऱ्या भाषेत दाखवण्यासाठी जशी डबिंग करणाऱ्या कलाकारांची फौज असते तशीच आणखी एका ‘साउंड इफेक्ट’साठी विशेष माणसं नेमलेली असतात. हे काम म्हणजे ‘फॉले’ (Foley). फॉले हा प्रकार म्हणजे पडद्यावर दिसणाऱ्या नेहमीच्या आवाजांच केलेलं डबिंग. म्हणजे समजा, सिनेमाच्या एका दृश्यात काचेचा ग्लास जमिनीवर पडून फुटतो तर अश्यावेळी फुटणाऱ्या काचेच्या ग्लासचा आवाज हा स्टुडीओ मध्ये काढला जातो. यालाच ‘फॉले’ म्हणतात.

याशिवाय सिनेमातील नेहमीचे लहानसहान आवाज देखील हे ‘फॉले आर्टिस्ट’ तयार करत असतात. मंडळी काय असतं की सिनेमाच्या चित्रीकरणात हे आवाज टिपले जातीलच असे नाही त्यामुळे हे आवाज नंतर दिले जातात. सिनेमा जिवंत करण्यात या फॉलेचा देखील मोठा वाटा असतो.

मंडळी खालील व्हिडीओ मध्ये याचं एक उदाहरण तुम्ही बघू शकता. यावरून तुम्हाला अंदाज येईलच की सिनेमा बनवणे तेवढे सोप्पे काम नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required