हिंदू गायक, सूफी संगीत आणि इंग्रजी गाणं.. ऐकाच हा जादूभरा संगम!!

मंडळी, तुम्हालाही एक व्हिडीओ आला असेल.. या व्हिडिओत कव्वालीची मैफिल भरली आहे आणि हे लोक चक्क जिंगल बेल्स कव्वाली स्टाईलमध्ये गात आहेत. हो, आम्ही याच व्हिडीओबद्दल बोलत आहोत. रोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातल्या काही लक्षात राहतात, तर काही सरळ डिलीट होतात. या ख्रिसमसला लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे हा व्हिडीओ. कव्वालीचा बाज आणि एक टप्प्यानंतर सुरु होणारं शास्त्रीय संगीत यांनी जिंगल बेल्स वेगळ्या ढंगात आपल्या समोर येतं. जिंगल बेल्सला यात अस्सल भारतीय टच दिला आहे.
राव, व्हिडीओ बद्दल एवढं बोलत आहोत, पण यात दिसणारे ते लोक कोण आहेत याचा विचार केला का? किंवा ही हटके आयडिया कोणाची आहे याचा विचार केला का? याचं उत्तर आम्ही सांगतो. ‘मयूख भुमिक’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकाराची ही मूळ संकल्पना आहे. मयूख असेच हटके प्रयोग करत असतो. "त्याने यावेळी ख्रिसमसच्या निमित्ताने जिंगल बेल्सवर आपली जादू दाखवली आहे.
ही मुळात संकल्पनाच हटके कारणासाठी तयार करण्यात आली. हिंदू गायक, इस्लामिक पद्धतीच्या (सुफी) सुरावटींनी एका ख्रिश्चन मूळ असलेल्या गाण्याला आणखी सुंदर बनवलं आहे.", असं स्वतः मयूख म्हणाला आहे.
तुम्ही हा व्हिडीओ खाली बघू शकता!!