computer

गली बॉयमधला MC शेर आवडला ना ? जाणून घ्या कुणी केलाय हा हार्ड रोल!!

सध्या गली बॉय चित्रपट खुप चर्चेत आहे. तेच तेच रटाळ चित्रपट पाहून बोर झालेल्या तरुणाईच्या काळजाला हा चित्रपट थेट जाऊन भिडतो. सध्या तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या रॅप या म्युझिक प्रकाराला घेऊन बनवलेला हा चित्रपट सामान्य घरातील तरुणांचा संघर्ष मांडतो. आपल्या टॅलेंटच्या जीवावर आता छोट्या शहरातील पोरं मोठी कामे करायला लागली. हे आपण बघत आहोत. त्याला अगदी धारावीतील झोपडपट्टी सुद्धा अपवाद नाही हेच गली बॉय मधून दिसून येते.

तर मंडळी गली बॉय मध्ये रणवीरची ऍक्टिंग जबरदस्त आहेच पण खरा भाव खाऊन गेला तो त्याचा मित्र MC शेर म्हणजेच ‘सिद्धांत चतुर्वेदी’. सिद्धांत चतुर्वेदीने रॅपरचं पात्र खऱ्या अर्थाने स्वतःत उतरवलंय. चित्रपट पाहत असताना आपण विसरून जातो की तो रॅपर नाही.

तर हा सिद्धांत चतुर्वेदी आता कुठे फोकस मध्ये आला, पण त्याच्या आधी तो काय करत होता, त्याची सुरुवात कुठून झाली ? त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे ? याबद्दल आपल्याला फारच कमी माहिती असते. चला तर ही माहिती आम्ही तुम्हाला देतो.

आज वाचूया सिद्धांत चतुर्वेदी या नव्या सुपरस्टारबद्दल !!

तसं तर सिद्धांतचा जन्म उत्तर प्रदेशमधील बलिया येथे झाला पण तो पाच वर्षांचा असताना त्याच्या परिवारासहित तो मुंबईत आला. सिद्धांतला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. मिठीबाई कॉलेजमध्ये बी कॉम करत असतानाच त्याने २०१२ साली क्लीन अँड क्लीयर बॉम्बे टाइम्सचा पुरस्कार जिंकून आपली चमक दाखवली होती.

सीएच्या सर्व परीक्षा पास होऊन सीए फायनलच्या वेळी एका ऑडिशनसाठी या पठ्ठ्याने परीक्षा सोडली होती. मग काय गडी मॉडेलिंग करायला लागला. सुरवातीला खुप संघर्ष करावा लागला. छोटे मोठे फोटोशूट्स आणि टीव्ही वरील जाहिराती केल्या, पण एक दिवस कोका कोलाची जाहिरात केली आणि भाऊ पुन्हा फॉर्मात आला. सिद्धांत बरेच दिवस मुंबईत नाटकांमध्ये काम करत होता. हा भाऊ फक्त चांगली ऍक्टिंग करतो असे समजु नका, सिद्धांत मार्शल आर्ट पण पटाईत आहे, त्याचबरोबर त्याने पाश्चात्य क्लासिकल डान्सची पण ट्रेनिंग घेतली आहे.

तुम्हाला ‘लाईफ सही है’ या मालिकेतील मधील साहिल हुडा आठवतो ? नाही ? तो साहिल हुडा म्हणजेच आपला सिद्धांत चतुर्वेदी ना राव ! कसे आठवेल म्हणा तेव्हा तो असेच छोटे मोठे रोल करत होता, पण त्या मालिकेतील त्याचा रोल चांगलाच गाजला होता. त्या मालिकेत काम करण्याची स्टोरी पण रंजक आहे. एका नाटकाच्या वेळी लाईफ सही है चे डायरेक्टर लव रंजन यांनी सिद्धांतला बघितले आणि त्यांनी सिद्धांतची साहिल हुडाच्या रोलसाठी निवड केली.

चला तर तुम्हाला अमेझॉन प्राईम तर माहीत असेलच त्यात काही दिवसांपूर्वी इंसाईड एज नावाची सीरिज आली होती. त्यात विवेक ओबेरॉय आणि रिचा चढ्ढासोबत सिद्धांन्त दिसला होता. गली बॉय मधल्या MC शेरचा रोल मिळण्याची स्टोरी सुद्धा जाम भारी आहे.

दिग्दर्शिका झोय अख्तरने सगळ्या पात्रांची कास्टिंग केली होती. फक्त एकच पात्र अजून सापडलं नव्हतं. ते म्हणजे MC शेर. गम्मत म्हणजे शुटींग ३ आठवड्यांवर आली होती. तर, झोया अख्तर एका पार्टीत गेली असता तिने पाहिलं की एक तरुण मुलगा स्टेजवर नाचतोय. त्या तरुणातली लयीची (रिदम) समज पाहून झोया भारीच इम्प्रेस झाली.

डान्स संपल्यावर झोयाने त्या तरुणाला म्हणजे आपल्या सिद्धांत भाऊला जवळ बोलावलं आणि स्वतःची ओळख करून दिली. त्यावर सिद्धांतने अफलातून उत्तर दिलं. तो म्हणाला की ‘मला माहित आहे तुम्ही कोण आहात, पण तुम्ही मला ओळखणार नाही म्हणून मी मुद्दाम तुम्हाला दिसेल असं नाचत होतो’....

याला म्हणतात ‘लक बाय चान्स’. झोयाने त्याला चित्रपटाबद्दल विचारलं, मग काय दुसऱ्याच दिवशी सिद्धांत ऑडिशन द्यायला गेला आणि MC शेर पात्रासाठी त्याची निवड झाली. आहे की नाही फुल्ल फिल्मी स्टोरी!!

सिद्धांत नाटकांमध्ये काम करत असताना ऍक्टिंग सोबत लेखन सुद्धा करायचा. सिद्धांत चतुर्वेदीच्या ऍक्टिंगने कोण इम्प्रेस झाले होते माहितीये?

साक्षात बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन! त्यांनी आपल्या हाताने पत्र लिहून या पठठ्याला फुलांसोबत पाठवले होते. याचसोबत त्याचे अष्टपैलू असण्याचे उदाहरण म्हणजे तो गिटार चांगली वाजवतो, पेंटिंग पण चांगली करतो. गाणे लिहितो पण आणि म्हणतो. एवढे सगळे गुण असल्यावर किती दिवस मागे राहणार होता तो, नाही का?

मंडळी आज सुपरस्टार असणारे आकाशातून पडत नसतात. तुमच्या आमच्या आजूबाजूला असणारे नंतर यशाची शिखरे सर करत असतात. सिद्धांत पण आपल्यापैकीच एक. त्याने स्वतःच पॅशन ओळखलं आणि सीए सारख्या प्रतिष्ठित करियरवर पाणी सोडुन तो अभिनयाकडे वळला. त्याच्यासारख्याच सामान्य पार्श्वभूमी असणारे राजकुमार राव, विकी कौशल सारखे अभिनेते आज बॉलीवूड गाजवत आहेत, सिद्धांत पण लंबी रेसचा घोडा आहे असे आता बोलले जात आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा लेख? आवडला असेल तर प्रतिक्रिया जरूर कळवा, आणि सिद्धांतसारखेच तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या तुमच्या मित्रांपर्यंत सिद्धांतची ही कहाणी पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेयर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required