computer

या मुलीने २ वर्ष फुल ब्राईटनेसवर मोबाईल वापरला....डोळ्याचं काय झालं पाहा !!

जास्त वेळ मोबाईल वापरल्याने डोळे खराब होतात. डॉक्टरच्या आधी आपल्या आईनेच आपल्याला हे बजावलेलं असतं. पण आपण ऐकतो का ? नाही !! काही जणांना तर मोबाईल पूर्ण ब्राईटनेसवर वापरायची सवय असते. पूर्ण ब्राईटनेस तर डोळ्यांसाठी आणखी घातक. तुम्हाला पण हीच सवय आहे का ? मग नुकतीच समोर आलेली ही मेडिकल केस तुम्हाला वाचायलाच हवी !!

या तरुणीचं नाव आहे 'चेन'. तिने २ वर्ष सतत मोबाईल वापरल्यानंतर नुकतंच तिच्या डोळ्यांना त्रास सुरु झाला. तपासणी केल्यावर समजलं की तिच्या उजव्या डोळ्याच्या आतल्या पडद्याला (कोर्निया) तब्बल ५०० छिद्र पडली आहेत. डाव्या डोळ्याची पण अशीच काहीशी स्थिती आहे.

आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर अनेक वर्षांपासून मोबाईल वापरतो, आम्हाला काहीच झालेलं नाही. तर, त्याचं असं आहे, की या मुलीने ६०० लुमिन्स म्हणजे ज्याला आपण फुल ब्राईटनेस म्हणतो त्यावर मोबाईल वापरला होता. तज्ञांच्या मते ३०० लुमिन्स पेक्षा जास्त प्रकाशाच्या पातळीने कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं. या मुलीने तर तब्बल ६०० पातळी ठेवली होती भाऊ.

तर मंडळी, मोबाईल वापरत असाल तर कमी ब्राईटनेसवर वापरा. जे या मुली सोबत झालं तेच तुमच्या सोबत होईल असं आम्ही म्हणणार नाही, पण डोळ्यांना इजा नक्कीच पोहोचू शकते.

सबस्क्राईब करा

* indicates required