computer

लॉकडाऊनचा करा सदुपयोग-कथा, पटकथा, संवाद शिका मराठीतल्या नामांकितांकडून आणि ते ही ऑनलाइन कार्यशाळेत!!

मंडळी, आपण जाणतो की ह्या लॉकडाऊन पश्चात जग प्रचंड बदलणार आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सने अनेक बदल आणले आहेत आणि त्यांचा वेग ह्या करोनाने आणखी वाढवला आहे. ह्या परिस्थितीत लेखन क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की, ना कोणती साथ त्याला अडवू शकते ना आर्टिफिशल इंटेलिजन्स! 

मंडळी, ओरिजनल कंटेटला जागतिक बाजारपेठेत आज कल्पनाही करता येणार नाही एवढी किंमत आहे. जेफ बजोज हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस… अमेझॉन ही त्याची कंपनी! त्यांनाही मनोरंजन क्षेत्रात यायची गरज का वाटत असावी? अगदी लॉकडाऊनच्या काळात जिथे सर्व काही ठप्प आहे तिथे मात्र ऑनलाइन स्ट्रीमिंग कंपन्या जश्या नेटफ्लिक्स, अमेझॉन इ. आपले नवं-नवे व्यावसायिक विक्रम प्रस्थापित करत आहेत. एकवेळ अशीही येईल जिथे ऍनिमेशनने पूर्ण चित्रपट बनेल...  ना शुटिंगची गरज लागेल ना कलाकारांची! मात्र एक जण ह्या मनोरंजन उद्योगाचा पाया आहे त्याला तुम्ही कधीही हलवू शकणार नाही तो म्हणजे लेखक!

कारण त्यासाठी आयुष्य जगावं लागतं. जगलेलं मांडता यावं लागतं आणि त्या मांडण्याच्या कलेतून मनोरंजक पद्धतीने सादरीकरण करावं लागतं. उपजत लिखाणाची आवड-कल असू शकते, पण हिऱ्यालाही पैलु पाडल्याशिवाय किंमत येईल का? तसंच लेखनाचं सुदधा आहे. लेखन कला हा विषय चिकाटीचा, कल्पकतेचा आणि तितकाच मेहनतीचा ही आहे. आणि यासाठीच संवेदन रायटिंग अकॅडमीने आपल्यासाठी आणली आहे ऑनलाइन लेखन कार्यशाळा! यामध्ये तुम्ही बारा दिवस बारा मान्यवर लेखकांकडून लेखन कला शिकू शकता ते ही केवळ एक हजार रुपये फी मध्ये! 

या लेखनासाठी आपला दृष्टिकोन काय असावा? 

पटकथा लेखन आणि त्याचे टप्पे, गीत लेखन, कथा लेखन, टीव्ही सिरियलसाठी लेखन, चित्रपट, नाटक किंवा अगदी वेब सिरिजसाठी लेखन. त्यासोबत ऑनलाइन पोर्टलसाठी लेख लिहिणे हा ही एक मोठा उद्योग होऊ पाहतो आहे. हे कसं केलं जात हे आपण शिकणार आहोतच पण त्याच बरोबर ह्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांनी आपल्या बुद्धीची मशागत कशी करावी? त्यासाठी सराव काय आणि कसा करावा? ह्या सगळ्या बाबतही मार्गदर्शन  मिळेल. त्याच बरोबर तुमच्या मनातले प्रश्न ही तुम्ही थेट विचारू शकाल, तेही तुमच्या आवडत्या ह्या क्षेत्रातील तज्ज्ञांना! 

ते ही एक दोन नाही तर तब्बल बारा जण आपल्या भेटीला येत आहेत! लेखक होण्यासाठी त्यांनी जे केलं ते आपल्या सर्वांना सांगतीलच आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरं ही देतील!  

कार्यशाळेसाठी आपले  मार्गदर्शक असणार आहेत पुढील मान्यवर...

1) रोहिणी निनावे

दामिनी ते अवंतिका, नवऱ्याची बायको ते मोलकरीण बाई आणि आई कुठे काय करते अशा मराठीत, तर हिंदीत यहाँ में घर घर खेली, बाजीगर अश्या अनेक मालिकांसाठी दहा हजाराहून अधिक एपीसोड लिहिणाऱ्या लेखिका.

2) श्रीकांत बोजेवार

एक हजाराची नोट, तहान, लोणावळा बायपास  अशा अनेक चित्रपटासाठी लेखन, लोकसत्तासाठी चित्रपट समीक्षक म्हणून तसेच दोन फुल एक हाफ, तंबी दूराई या गाजलेल्या सदरासाठी लेखन, सध्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये कार्यरत.

3) अभिजित गुरू

अवघाची संसार, देवयानी, लक्ष, नकुशी, नकळत सारे घडले, माझ्या नवऱ्याची बायको, रंग माझा वेगळा अश्या अनेक मालिका तर तळ्यात मळ्यात, तीन पायांची शर्यत, आणि अलीकडेच गाजलेल्या 'थोडं तुझं थोडं माझं' ह्या नाटकाचे लेखक.

4) शिरीष लाटकर

गोजिरी, मितवा, सविता दामोदर परांजपे अशा अनेक गाजलेल्या चित्रपटासाठी लिखाण. कृपासिंधु, साईबाबा, स्वामी समर्थ अश्या छत्तीस मराठी तर पवित्र रिश्ता, क्राईम पेट्रोल, सरोजिनी अशा अठरा हिंदी सिरियलसाठी बारा हजाराहून अधिक एपीसोड, बुढा होगा तेरा बाप, कोण कोणासाठी अश्या अनेक गाजलेल्या नाटकांचे लेखक.

5) वैभव जोशी

आनंदी गोपाळ, पांघरूण, AB आणि CD, मन फकिरा, मी पण सचिन, धप्पा, अधम,  66 सदाशिव अश्या कैक चित्रपटांसाठी गीतकार. मी... वगैरे या हा कविता संग्रह तर सोबतीचा करार हा त्यांचा कवितांचा कार्यक्रम प्रसिद्ध आहे.

6) सौमित्र पोटे

चित्रपट समीक्षक, कलाकार-दिग्दर्शका समवेत लाईव्ह समीक्षेचे प्रयोग करणारा पहिला समीक्षक. ABP माझासाठी समीक्षक व पत्रकार म्हणून कार्यरत. 'पुस्तकातून' ह्या गाजणाऱ्या ब्लॉग साठी लेखन.

7) समीर गायकवाड

सत्तेचाळीस लाखाहून अधिक वाचक असलेल्या ब्लॉगसाठी लेखन. ऑनलाइन कंटेंटसाठी गाजणारा लेखक
'गवाक्ष' हे लोकसत्तासाठी तर दिव्यमराठीसाठी 'प्रिझम', 'पोएसी', देशभरातील वेश्यांच्या आयुष्यवर 'रेड लाईट डायरीज' लोकमतसाठी सदर लेखन. याशिवाय दैनिक सामना, एबीपी माझा वाहिनीकडून सर्वोत्कृष्ट ब्लॉगरचा पुरस्कार व वाहिनीच्या पोर्टलवर दोन वर्षे ब्लॉगलेखन.

8) आशिष पाथरे

दिल दोस्ती दुनियादारी, असा मी तसा मी, हास्य सम्राट, मालवणी डेज, महाराष्ट्राचा सुपरस्टार, अस्सल पाहुणे इरसाल नमुने, दोन स्पेशल, सह्याद्री अंताक्षरी, कॉमेडी सर्कस, फ्रेशर्स, मोगरा फुलला, अश्या अनेकविध मालिकांसाठी लेखन. गुरू, उर्फी, हुतुतू  या चित्रपटांसाठी आणि अनेक अवॉर्ड फंकशन्ससाठी लेखन. मेरी सपनो की रानी हे नाटक.

9) गणेश पंडित

स्पंदन, तुझे नी माझे घर श्रीमंतांचे, खेळ मांडला, जागो मोहन प्यारे अश्या अनेक मालिकांसाठी लेखन. हंगामा, फिर हेरा फेरी, सदरक्षणाय, लव्ह यु जिंदगी, हिचकी आणि नुकत्याच गाजलेल्या मेकअप या चित्रपटांसाठी लेखन. योलो या वेब सिरीजचे लेखन. प्रोमो रायटिंग आणि अनेक कार्टून सिरीजसाठी लेखन.

10) मनीषा कोरडे

तुम, व्होडका डायरीज, कुस्ती, भुलभुलैय्या, बिल्लू, ढोल अश्या  अनेक  गाजलेल्या हिंदी चित्रपटांसाठी लेखन. परछाई वेबसिरीजसाठी लेखन.

11) अंबर हडप

असंभव ते सध्या गाजत असलेल्या 'समांतर' अशी प्रदीर्घ लेखन कारकीर्द! बालक-पालक, रंपाट, हिचकी, बंध नायलॉनचे, बाळकडू, येल्लो, अंड्याचा फ़ंडा,  चिवित्रच सारे, एक दुसरे के लिये अश्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी लेखन.

12) क्षितिज पटवर्धन

YZ, डबल सीट, क्लासमेट, टाईम प्लिज, लग्न पहावे करून, टाईम पास, सतरंगी रे या गाजलेल्या चित्रपटांचे लेखक.


तर मंडळी, दिनांक 11 मे ते 23 मे रोज सायंकाळी सहा ते आठ ह्या वेळेत फेसबुक प्रायव्हेट ग्रुपच्या माध्यमातून ही कार्यशाळा लाइव्ह पद्धतीने सुरू राहील. कोणी अगदी त्यावेळेत नाही पाहू शकलं, तर तुमच्या सोईप्रमाणे 30 मे पर्यंत तुम्ही राहिलेली सत्र ही पाहू शकाल. अगदी तुम्हाला आवडलेलं सत्र परत-परत ऐकून त्याच्या नोट्स काढू शकाल! मुंबई-पुण्याबाहेरील लेखकांसाठी सुद्धा शिकायची ही सुवर्णसंधी आहे. यात काही नमुना पटकथा अभ्यासासाठी प्रत्येकाला दिल्या जातील.

या बारा दिवसाच्या उपक्रमाची फी केवळ एक हजार रुपये ठेवलेली आहे कारण फक्त एकच… सध्या आपण ज्या लॉकडाऊन फेज मधून जात आहोत त्याचा सर्वांनाच काहीतरी सदुपयोग व्हावा. हजारो-लाखो रुपये घेऊन जे ज्ञान दिलं जात ते ऑनलाइन अगदी सामान्यातील सामान्य माणसालाही परवडेल अश्या किमतीत देण्यासाठी संवेदन रायटिंग अकॅडमी झटते आहे. आपल्या ओळखीच्या चांगलं लिहिणाऱ्या लिहू शकणाऱ्या पर्यंत हा संदेश पोहोचवायला विसरू नका.

या कार्यशाळेबाबत अधिक माहिती आणि नोंदणी साठी आपण आमच्या 7715830574, 7715901298, 8668336768 या क्रमांकांवर संपर्क साधू शकता!

तर मग येताय ना लेखन कला शिकायला?

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required