computer

या बाईने अस्वल चक्क कुत्रा म्हणून खपवायचा प्रयत्न केला? बघा तर ती आणखी काय म्हणतेय..

हे परदेशी लोक कधी काय करतील आणि कधी काय म्हणतील याचा काही नेम नाही मंडळी. त्यांचे काहीच खरे नाही, हेच खरे आहे. नुकतीच घडलेली एक घटना बघितली तर तुम्हीसुद्धा म्हणाल, "काय नमुने असतात राव हे लोक"!! 

मंडळी, नुकतीच एका मलेशियन गायिकेला पोलिसांनी अटक केली.  कारण काय होतं माहित आहे? तिने चक्क अस्वल पाळले होते हो. कुत्रा पाळणे, मांजरी पाळणे हे समजण्यासारखे आहे, पण अस्वल कोण पाळतं राव? कदाचित त्या बाईला 'आज कुछ तुफानी करते है' वाला किडा चावला असेल. मलेशियाच्या राष्ट्रीय उद्यान आणि प्राणी संवर्धन खात्याने तक्रार दिली आणि बाईला जेलची हवा खावी लागली. कोर्टात या गायिका बाईंनी दिलेली साक्ष ऐकून तुमचे पण डोळे विस्फारतील मंडळी!! बाई कोर्टात सांगते की "मला माहितच नव्हते की तो अस्वल आहे.  मी तर त्याला कुत्रा समजत होते". तुम्ही म्हणाल, ही बाई थेट कोर्टाला मुर्खात काढत आहे. पण पुढे तिने अजून काय काय तारे तोडले ते आधी बघून तर घेऊ...

झरिथ सोफीया यासीन नावाची ही मलेशियन गायिका आहे. तिला या प्रकरणाविषयी मिडियाने प्रश्न विचारल्यावर तिने सॉलीड टेपा लावल्या राव! एकदा म्हणते की रात्रीच्या अंधारात एक प्राणी रस्त्याच्या कडेला फिरत असताना मला दिसला आणि तो कुत्रा आहे असे समजून मी त्याला घरी घेऊन आले. दुसऱ्या एका इंटरव्ह्यूमध्ये बाई सांगते की ते अस्वल मला एका पर्यटनस्थळी सापडले आणि मी त्याला घरी घेऊन आले. आता बाईंचा कुठला इंटरव्ह्यू खरा मानावा मंडळी?? एवढं होऊन बाईने त्या अस्वलाचे नावसुद्धा ठेवले होते - ब्रुनो!! 

मंडळी, प्रत्येक देशाचे प्राणी पाळण्यासंबंधी कायदे असतात आणि मुळात अस्वल हा पाळीव प्राणी नाहीच. आधी तो अस्वल  आहे, नंतर  कुत्रा आहे असे मला वाटले सांगणारी झरिथ बाई पोलिसांनी दम दिल्यावर मात्र खरे बोलायला लागली. मला कायद्यासंबंधी सगळी माहिती होती आणि कायदा तोडण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता अशी सारवासारव तिने केली. अस्वलाला घरी आणल्यावर काही दिवस घरी ठेऊन त्याला प्राणी संग्रहालयात देण्याचा माझा विचार होता असे पण तिने म्हणायला कमी केले नाही.  माझ्यासोबत असताना मी त्याला कुठलाही त्रास होऊ दिला नाही, उलट शक्य तितकी चांगली काळजी घेतली असाही दावा बाईंनी केला. अस्वल पाळायचे नसते हे मला माहिती आहे, पण मला त्याची काळजी वाटत होती म्हणून मी त्याला घरी आणले. त्याची चांगली सेवा करावी या माझा हेतू होता असे झरिथने सांगितले.

ण मंडळी, तुम्ही म्हणाल झरिथने अस्वल घरात लपवून ठेवले असेल. मग पोलिसांना कसे समजले? चोराने कितीही प्रयत्न केला तरी काही ना काही पुरावे मागे राहतातच ना राव!! इथे पण असेच झाले. झरिथच्या घराच्या खिडकीतून डोकावत असतानाचा अस्वलाचा व्हिडीओ वायरल झाला आणि पोलिसांनी तिच्या घरावर रेड टाकली आणि बाई अडकली. ती प्राण्यांना विकण्याचा धंदा करते असे आरोप तिच्यावर व्हायला लागले. पण तिने सगळे आरोप नाकारत गाण्यांच्या माध्यमातून मला खूप पैसे मिळतात. मला असे कामं करण्याची गरज नाही असे सांगितले. खरेखोटे काय ते कळेलच. पण या प्रकरणातून अस्वलाला कुत्रा म्हणण्यामुळे झरिथ बाईचे हसू मात्र नक्की झाले राव!!

मंडळी, चोरी सापडल्यावर अशीच भन्नाट कारणे देणाऱ्या तुमच्या मित्रांसोबत आमचा हा लेख जरूर शेअर करा...

 

आपल्या देशात प्राण्यांना पाळण्याचे काय कायदे आहेत हे ही पाहून घ्या, काय?

सबस्क्राईब करा

* indicates required