computer

हरिवंशराय बच्चन यांची ११३वी जयंती.....वाचा ‘मधुशाला’चा मराठी अनुवाद !!

हिंदी साहित्याला नवीन वाट दाखवणाऱ्या हरिवंशराय बच्चन यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यांच्याबद्दल बोलताना म्हटलं जातं की सौंदर्यापेक्षा भावनांना महत्व देणारा हा कवी होता. त्यांचे सहज सुंदर शब्द स्वतः बरोबर एक गुढार्थ घेऊन यायचे. ‘जो बीत गयी सो बात गयी', 'अग्निपथ' (अग्निपथ सिनेमातील ती प्रसिद्ध कविता) आणि 'इस पार उस पार' या त्यांच्या श्रेष्ठ कविता ठरल्या तर त्यांच्या प्रतिभेचा परमोच्च बिंदू ठरली ‘मधुशाला’ ही दीर्घकविता.

मधुशाला या दीर्घकवितेत १३५ रीबाई (कडवी) आहेत. १९३५ साली पहिल्यांदा प्रसिद्ध झाल्यानंतर कवितेची सगळीकडून प्रशंसा झाली. सोबतच मधुशाला या शब्दाने आणि कवितेत येणाऱ्या ‘मदिरालय’, ‘दारू’, ‘ग्लास’, ‘दारू वाढणारी’ इत्यादी वर्णनामुळे कवितेवर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. ही कविता तयार होताना सोबत सुफी गुण घेऊन आली आहे. वरवर दिसणाऱ्या मदिरालय आणि दारू शब्दांच्या आडून हरिवंशराय बच्चन यांना जीवनाच्या जटीलतेचं वर्णन करायचं आहे.

मधुशाला कवितेचं डॉक्टर वामन पंडित यांनी मराठीत सुंदर अनुवाद केला आहे. हरिवंशराय बच्चन यांच्या ११३व्या जन्मदिनानिमित्ताने मधुशालाच्या मराठी अनुवादातील मोजकी कडवी आम्ही देत आहोत. ८५ वर्ष जुनी मधुशाला मराठीतून वाचताना आजही तेवढीच ताजी वाटेल.

कवी : हरिवंशराय बच्चन

मराठी अनुवाद : डॉ. वामन पंडित

प्रकाशक : शब्दांगण प्रकाशन, ठाणे

 

हरिवंशराय बच्चन यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त त्याना बोभाटातर्फे भावपूर्ण आदरांजली...

सबस्क्राईब करा

* indicates required