व्हिडीओ ऑफ दि डे : परदेशी तरुणांनी मुंबई मध्ये केला थरकाप उडवणारा स्टंट....पाहा हा व्हायरल व्हिडीओ!!

मंडळी, सैन्यात ‘पार्कर’ (Parkour) नावाचा एक व्यायामाचा प्रकार असतो. प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही साधनांशिवाय अडथळे पार करता यावेत म्हणून हा व्यायाम शिकवला जातो. ‘पार्कर’ व्यायामात धावणे, चढणे, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी उंच उडी मारणे असे प्रकार असतात. हा व्यायाम प्रकार सामान्य माणसांमध्येही प्रसिद्ध आहे. पण व्यायाम म्हणून नव्हे तर स्टंट म्हणून. आता बघा ना जगभरात चक्क ‘पार्कर’ ग्रुप तयार झाले आहेत.
सैन्यामध्ये याला आजही व्यायामच म्हणतात, पण सामान्य लोकांनी याला स्टंटचं रूप दिलंय. मुंबईच्या दादर मध्ये २ परदेशी तरुणांनी असाच स्टंट करून मुंबईकरांना धक्का दिला आहे. त्याचं झालं असं की, त्यांच्यातील एकाने दादर भागातील १४ माळ्याच्या बिल्डींग वरून तेवढ्याच उंच बिल्डींगवर उडी मारली होती. हा पाहा त्या स्टंटचा व्हिडीओ :
राव, दोघांनी व्हिडीओ शूट नंतर गुपचूप तिथून पळ काढला होता, पण मुंबई पोलिसांनी त्यांना लगेचच शोधून काढलं. असं म्हणतात की दोघे भारतात एका बिझनेस ट्रीपसाठी आले आहेत. पण कदाचित फावल्या वेळेत त्यांना या उचापती सुचल्या असतील. त्यांना मदत करणाऱ्या आणखी ५ जणांचा सध्या शोध सुरु आहे.
राव चुकुनही असले माकडचाळे ट्राय करू नका बरं !!!