computer

भेटा आजन्म २२ वर्षांची राहणाऱ्या आणि वर्षाकाठी ६,००,००,००० रुपये कमावणाऱ्या सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सरला..

गेल्या २ वर्षात सोशल मीडियावर इंफ्ल्युयंसर नावाची नवीन गोष्ट उदयाला आली आहे. अगदी लहान शहर किंवा खेड्यात राहून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या लोकांना इंफ्ल्युयंसर म्हटले जाते. सोशल मीडियावरील प्रसिद्धिच्या जोरावर ही लोक अनेक जाहिराती करतात आणि त्यातून पैसे कमवतात.

सध्या रोझी नावाची एक इंफ्ल्युयंसर जगभर चर्चेत आहे. ही इंफ्ल्युयंसर २२ वर्षांची आहे. ती चर्चेत असण्याचे कारण म्हणजे ती आयुष्यभर २२ वर्षांचीच राहणार आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? याचे कारण असे आहे की ती खरी व्यक्ती नसून ती कृत्रिम इंफ्ल्युयंसर आहे. दक्षिण कोरियाच्या साईड्स स्टुडिओ एक्स या कंपनीने ही रोझी तयार केली आहे.

या रोझीने गेल्या एका वर्षात तब्बल ६ कोटी कमावले आहेता आणि तिच्याकडे १०० ब्रॅंडचे काम आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ७४,००० फॉलोअर्स आहेत. तिची प्रोफाइल बघितली तर कुणीही म्हणणार नाही की ही खरीखुरी बाई नाही. ती योगा करते, केक कापताना दिसते, ऍडमध्ये काम करताना दिसते. अतिशय सुंदर दिसणारी ही पोरगी बघून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. पण वास्तविक ही रोझी काही सॉफ्टवेअर्सच्या साहाय्याने तयार केलेले एक कॅरेक्टर आहे.

तिला तयार करताना सौंदर्याचे सर्व गुण तिच्यात दिसतील याची काळजी घेतली गेली आहे. विशेष म्हणजे जी इंफ्ल्युयंसर मंडळी सध्या सोशल मीडियावर दिसतात, त्यांची वयं वाढत राहतील. पण ही रोझी मात्र नेहमी आज जशी आहे तशीच राहील. या प्रकारच्या कृत्रिम इंफ्ल्युयंसर तयार करण्यावर जगभर अब्जावधी रूपये खर्च केले जात आहेत.

ओरिजिनल इंफ्ल्युयंसरना जितके पैसे द्यावे लागतात त्यामानाने अशा कृत्रिम व्यक्तीरेखा बनवणं मुळात कमी खर्चिक आहे. हे कधीही थकत नाही की तक्रार करत नाहीत. मनाप्रमाणे यांच्याकडून काम करवून घेतले जाऊ शकते. यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती मोठ्या प्रमाणावर लोकांचे रोजगार आता खाऊ लागले आहे हे मात्र ठळकपणे समोर येत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यावर इंफ्ल्युयंसर होऊन जी कमाई करता येते त्याला हे कृत्रिम इंफ्ल्युयंसर मोठ्या प्रमाणावर आता धोका निर्माण करणार आहेत.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required