धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशी रिलीज झालेय त्याच्यावरच्या पिक्चरचे पोस्टर.

धोनीच्या आयुष्यावर चित्रपट येतोय. नाव आहे "एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी". त्याचे आज पोस्टर रिलीज झाले आहे. तुम्हाला तर माहीत असेलच ह्यात धोनीचा रोल करतो आहे सुशांत सिंग राजपूत.

30 सप्टेंबरला येणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करायला आजचा म्हणजेच धोनीच्या वाढदिवसाचा मुहूर्त निवडला आहे. पोस्टर वर माही काय करत नाहीए? हा एकदम बॉलिवूड स्टाइल चारित्रपट असावा असा अंदाज बांधता येतोय. 

या चित्रपटाची आपण वाट पाहूयात पण तोपर्यंत आपण आपल्या कूल कॅप्टनला "हॅपी बड्डे" करूयात.

 

सबस्क्राईब करा

* indicates required