बांगला देशात पुन्हा एकदा अतिरेक्यांचे थैमान ! प्रार्थनेसाठी एकत्र आलेल्या जमावावर हल्ला !!

अतिरेकी हल्ल्याच्या सर्पाने पुन्हा एकदा ढाक्यात फणा वर काढला असून आज नमाजासाठी एकत्र आलेल्या जमावावर अतिरेक्यांनी ग्रेनेड वापरून हल्ला केला. किशोरगंज भागात हा हल्ला झाला असून हल्ला झालेल्या ठिकाणापासून जवळच नमाजासाठी २ लाख माणसे जमा झाली होती. या हल्ल्यात २ बांगलादेशी पोलीस ठार झाले तर अनेक जखमी झाले आहेत. हा हल्ला कोणत्या आतंकवादी संघटनेने केला या बद्दल काहीच माहिती मिळू शकलेली नाही.

आठवडाभरापूर्वी इसीसच्या हल्यात २० जणांना ठार केले होते. हा हल्ला मागील काही वर्षातला सर्वात मोठा आतंकवादी हल्ला होता. त्या धक्क्यातून सावरण्याआधीच दुसऱ्या हल्ल्याने बांगलादेश हादरून गेले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required