computer

वर्ल्डकप २०१९ साठी अशी असेल टीम इंडिया.... कोणकोणते धुरंदर टीम मध्ये आहेत पाहा बरं !!

मंडळी, आज १५ एप्रिल २०१९ ही तारीख गेम ऑफ थ्रोन्सच्या पंख्यांसाठी अत्यंत महत्वाची होती, पण आणखी एका वर्गासाठी हा दिवस महत्वाचा होता. अहो क्रिकेट प्रेमींचं बोलतोय भाऊ. पुढच्या महिन्यात येऊ घातलेल्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा होणार होती. थोड्याच वेळा पूर्वी ही घोषणा झाली आहे.

चला तर भारतीय क्रिकेट संघात कोणकोण असणार आहे ते पाहू.

नेहमीप्रमाणे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विश्वचषकासाठी खेळणार आहे. रोहित शर्मा उपकर्णधार असेल. दिनेश कार्तिकला महेंद्रसिंग धोनी सोबत विकेटकीपर म्हणून निवडण्यात आलं आहे. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, केदार जाधव आणि विजय शंकर यांना ऑलराउंडर म्हणून घेण्यात आलं आहे. गोलंदाजीच्या फळीत युजवेंद्र चहल, कुलदीप जाधव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे असतील. ऋषभ पंतला मात्र टीम मध्ये संधी मिळालेली नाही. त्याच्याऐवजी के एल राहुलची वर्णी लागलेली आहे.

आता आपण संपूर्ण लिस्ट पाहूया.

१. विराट कोहली (कर्णधार)

२. रोहित शर्मा (उपकर्णधार)

३. शिखर धवन

४. के. एल. राहुल

५. महेंद्रसिंग धोनी

६. केदार जाधव

७. दिनेश कार्तिक

८. हार्दिक पंड्या

९. रविंद्र जडेजा

१०. जसप्रीत बुमराह

११. विजय शंकर

१२. भुवनेश्वर कुमार

१३. कुलदीप यादव

१४. युजवेंद्र चहल

१५. मोहम्मद शमी

मंडळी, या यादीत आणखी कोण असायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं ?? सांगा बरं !!