computer

नवाझुद्दीनने या सिनेमासाठी घेतलेलं मानधन पाहून तुम्हांला धक्काच बसेल...

सुरुवातीला दोन पैसे मिळावेत म्हणून अगदी छोट्या भूमिका करणारा नवाजुद्दिन सिद्दिकी आज मोठमोठ्या बॅनर्स बरोबर काम करतोय. त्याचे दिवस पालटले, त्याच्या अभिनयाचा कस लागेल अशा भूमिका त्याला मिळाल्या, चांगल्या कथा त्याच्या वाट्याला आल्या. आता तो या फिल्म इंडस्ट्रीत रुळला आहे. कलाकार एवढ्या उंचीवर पोहोचल्यावर त्याच्या काय अपेक्षा असतात हे त्याच्या ‘मंटो’च्या भूमिकेवरून लक्षात येईल.

नवाजुद्दीन सिद्दिकीचा आगामी सिनेमा ‘मंटो’ २१ सप्टेंबर रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका ‘नंदिता दास’ यांनी नुकत्याच एका इंटर्व्ह्युत सांगितलं की नवाजुद्दीनने ‘मंटो’च्या भूमिकेसाठी फक्त १ रुपया मानधन मागितलं होतं. त्याला सिनेमाची कथा एवढी आवडली की मानधन हा प्रश्नच उरला नाही. त्याने ‘मंटो’च्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि साकारलेला अभिनय बघून या कलाकाराला आता चांगल्या भूमिकांचीच भूक उरली आहे असंच दिसतं.

नवाजुद्दीन सोबतच चित्रपटातील इतर बड्या कलाकारांनी जसे की परेश रावल, रिशी कपूर, रणवीर शौरी, दिव्या दत्ता, आणि जावेध अख्तर यांनी सुद्धा अशाच प्रकारचा प्रतिसाद दिला. सगळेच चित्रपटाच्या कथेने भारावले होते.

‘मंटो’ बद्दल थोडक्यात :

‘मंटो’ हा सिनेमा उर्दू लेखक ‘सआदत हसन मंटो’ यांच्या जीवनावर आधारित आहे. इतर कोणीही लिहू धजणार नाही अशा वादग्रस्त विषयांवर त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता लिहिलं. यामुळे त्यांच्यावर अनेकदा कार्यवाही सुद्धा झाली. पण हा लेखक काळाच्या पुढचा होता. त्यांच्या टोबा टेकसिंह, बू, खोल दो, ठंडा गोश्त, इत्यादी कथा प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ‘मंटो’ सिनेमा बघावा लागेल. तोवर या सिनेमाचा अफलातून ट्रेलर बघून घ्या. तुम्ही जर नवाजुद्दीनचे फॅन नसाल तर तुम्ही त्याचे फॅन व्हाल आणि जर असाल तर नव्याने त्याच्या प्रेमात पडाल !!

सबस्क्राईब करा

* indicates required