यावर्षीचे टेस्टी टीझर - 'गुलाबजाम'...पाह्यलंत की नाही अजून?

Subscribe to Bobhata

हिंदीमध्ये यावर्षी पद्मावत, पॅडमॅन, रोबॉट २.०, ठग्स ऑफ हिंदुस्तान, सारखे दमदार सिनेमे येऊ घातले आहेत. पण मराठीचं काय? मराठीसाठी २०१७ हे वर्ष काहीसं थंड होतं. कारण बॉक्स ऑफिसवर कल्ला करणारे मोजकेच सिनेमे रिलीज झाले आणि तेही जेमतेमच हिट होते. ती सध्या काय करते आणि फास्टर फेणे यांना त्यातल्या त्यात काहीसा चांगला प्रतिसाद मिळाला.

तर मंडळी, २०१८ हे वर्ष मराठी सिनेमांसाठी कसं असणार असा विचार करत असतानाच एका नवीन सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा सिनेमा आहे ‘गुलाबजाम’. सचिन कुंडलकर या दिग्दर्शकाचा हा नवा कोरा सिनेमा आहे.

‘चांगल्या पदार्थाची पहिली खूण असते त्याचा वास…’ या वाक्याने टीझरची सुरुवात होते आणि पुढे आपल्याला दिसतात स्वयंपाक करणारे  दोन किंवा चार हात, पण चेहरा कोणाचाच दिसत नाही आणि बॅकग्राउन्डला एक आवाज ऐकू येत असतो. थोड्याच वेळात आपल्याला आवाज ओळखीचा वाटू लागतो.

थोडा विचार आणि गुगल केलं की समजतं, हा आवाज तर ‘सोनाली कुलकर्णी (सिनियर)’ यांचा आहे. सोनाली कुलकर्णी यांच्याशिवाय मुख्य भूमिकेत सिद्धार्थ चांदेकरसुद्धा आहे. एकंदरीत टीझर आणि सिनेमाचं नाव बघता असं दिसतंय की कथा कुकिंगच्या अवतीभवती फिरणारी आहे. आता सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांची यादी बघितली की लक्षात येईल त्यांचा हातखंडा नेहमी नवीन काही तरी दाखवण्याकडे असतो. तो इथेही असेल असं टीझरवरून तरी दिसतंय.

१६ फेब्रुवारी २०१८ रोजी हा ‘गुलाबजाम’ आपल्या ताटात वाढला जाणार आहे. आपण आशा करूयात की हा वर्षातला सर्वात Tasty चित्रपट असेल!!

सबस्क्राईब करा

* indicates required