ही कार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कशी पोहोचली ? वाचा या उडणाऱ्या कार मागचं रहस्य !!

कधी उडणारी कार बघितली आहे ? नाही ? मग आम्ही दाखवतो. खाली बघा !!

स्रोत

बघितली? ही आहे जगातील पहिली उडणारी कार. हां, आता उडता उडता इमारतीत घुसली आहे म्हणा, पण आहे उडणारी कार बरं का!! आता तुम्हाला वाटेल ही टेक्नोलॉजीचा कमाल असेल वगैरे, पण ही खरी कमाल केलीय या कारच्या ड्रायव्हरने...

चला तर बघूयात, या ड्रायव्हरने असला काय कारनामा केला की नॉर्मल कारची फ्लाईंग कार झाली...

तर ही गोष्ट आहे कॅलिफोर्नियाची. हा कार चालक अत्यंत वेगाने कार चालवत होता. कार एवढ्या वेगात कोणी सहसा चालवत नाही, पण या महाशयांनी दोन पेग मारून ठेवले होते त्यामुळे त्यांना ते सहज जमलं. तर अशी ही कार हायस्पीड मध्ये धावत असताना ती डिव्हायडरला जाऊन धडकली. धडकल्यानंतर तिच्या वेगामुळे ती हवेत उडाली आणि सरळ एका इमारतीचा पहिला मजला तोडून आत शिरली. या मजल्यावर एक डेंटिस्टचं क्लिनिक होतं, पण सुदैवाने क्लिनिकमध्ये त्यावेळी कोणी नसल्याने कोणाचाही जीव गेला नाही.

स्रोत

एवढ्या भयानक अपघातानंतरही कोणाचाही जीव गेलेला नाही, पण भलं मोठं भगदाड मात्र पडलंच. या कारमधल्या दोघांचाही जीव वाचला आहे. त्यातील एकजण गाडीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाला आणि दुसरा एक तास गाडीत अडकून राहिल्यानंतर फायर ब्रिगेडच्या माणसांनी त्याला बाहेर काढलं. या मजल्यावर कार घुसल्यानंतर आगही लागली होती, पण ती नंतर विझवण्यात आली.
सर्वात जास्त मेहनत लागली ती या कारला बाहेर काढण्यासाठी. काही तासांच्या प्रयत्नानंतर शेवटी कार जमिनीवर आली.

तर अशाया उडत्या कारच्या ड्रायव्हरला त्याच्या 'कार'नाम्यामुळे जेलची हवा खावी लागली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required