अस्सल गावरान तडका आणि सातारी ठसका घेऊन आलीय झक्कास प्रॉडक्शनची वेबसीरीज- 'गांव लई झ्याक'!!

Subscribe to Bobhata

कोन कोन हाय मंग या झ्याकवाडीमधी ? त्यासाठी या टीमने बनवलेले सगळे प्रोमोज बघावेच लागत्यात मंडळी!! तरीपन आमी जरा वळख करुन देतोच बरं.. 

हितं हायत सरपंच वाघमारे आणि त्यांची बायकू, ष्ट्रेट फॉर्वर्ड आणि कुणाला भीक न घालणारी धुरपी, सरपंच हुन्याची इच्छा असनारे साळुंके आनि त्यांचे पंटर लोक, गावातल्या नाटकात नटी  हुनारा तात्या, कुनी बोलीवलं न्हाई तरी इनाकारन मधी मधी करनारी चंदाआजी, गावातलं लई कळकळीनं शिकिवनारं मास्तर.. आनि ह्ये सगळे कमी की काय म्हनून या झ्याकवाडीत हाय आपला हिरो आक्या, गावातली प्रिया वॉरियर आनि हिरोईन वैशी, दोगांचे मैतर आणि सगळ्यावर वरतान या आक्क्याचं नाना!!

अहो, ही तर झाली नुसती मेन मंडळी. यांच्याबरुबर आनि लै जन हायेत या झ्याकवाडीत आनि म्हनूनच "गांव लई झ्याक" या वेबसिरीजमंदी पन. बगाच ह्यो पैला एपिसोड आनि त्ये झाल्यावर प्रोमोज बगायला पन इसरु नका बरं.

तर, आमी म्हनलं कोन हायेत ही मंडळी ? या "गाव लई झ्याक"च्या आयडियाची कल्पना हाय निर्माते डॉ. अजय वाडते आणि तुषार बाबर या दोघांची. हे निर्माते आणि महेश देवरे चांगले दोस्त हायत. यां तिघांना वाटलं की आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यात आपुनबी कायतरी करायला पायजे. म्हनून या वेबसीरीजला यांनी हात घातलाय. खरंतर यांची लई  तयारी पण  नव्हती. पण त्यांनी मनात आनलं आनि देवाची ही तेवढीच साथ लाभली. यांना डायरेक्टर म्हणून जमीर आत्तार सर  आनि त्यांची  टीम मिळाली. 

तुषार बाबर यांन्ला तुम्ही या झ्याकवाडीच्या सरपंचाच्या भूमिकेत बगनार हायच. त्याची पन लै भारी गोस्ट हाय. हे समदे लोक ऑडिशन घेत असताना एपिसोडमधल्या प्रेम्याला तुषार नक्की काय करायचं हे सांगत  होते. तेवाच त्येंन्ला कळलं की सरपंच म्हणून तुषाररावच लई झ्याक हायेत. 

जसं नागराजभौंनी त्येंच्या  सैराटचं शूटिंग त्यांच्या करमाळ्यात क्येलं, तसं "गांव लई झ्याक"चं  शूटिग हे निसर्गाचं अद्भुत सौंदर्य लाभलेल्या राजापुरी तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी केलेलं हाये. पहिल्या प्रोमोचं शूटिंग ११ मार्च ला झालं आनि आजच्या घडीला १७,००० सबसक्राईबर्स मिळाले आहेत. तर मंडळी "गांव लई झ्याक"चा पैला एपिसोड बगाच आनि Zakkas production  ला सबसक्राईब व लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.