computer

एकाने दुसर्‍याच्या कल्पनेची कॉपी करणं म्हणजे प्लेजरिझम- एका सिनेनिर्मात्याला कॉपी करणं किती महाग पडलं हे वाचा

सिने इंडस्ट्रीत कॉपी करणं हा जुनाट आजार  आहे.सध्या सप्टेंबर महिना चालू आहे. हा महिना एका हॉलिवूड चित्रपटाची म्हणजे 'कम सप्टेंबर' ची आठवण करून देतो.

या चित्रपटात एक म्युझिकल ट्रॅक होता जो साठीच्या दशकाच्या सुरुवातीला 'कम सप्टेंबर ट्यून' म्हणून प्रसिद्ध होता.हा ट्रॅक लग्नातील बँडबाजात वाजलाच पाहिजे असा त्या काळी अलिखित नियमच होता.

मध्यंतरात बरीच वर्षे गेली आणि ही ‘कम सप्टेंबर’ची धुन नदीम -श्रावण यांनी १९९५ साली  'राजा' चित्रपटासाठी कॉपी केली. ते गाणं म्हणजे 'नज़रें मिली दिल धड़का,मेरी धड़कन ने कहा लव्ह यु राजा' या गाण्याचा अंतरा वेगळ्या पध्दतीने केला होता पण सुरुवात 'कम सप्टेंबर'चीच कॉपी होती.

'कम सप्टेंबर'ची कॉपी म्युझिक ट्रॅकपुरती मर्यादित नव्हती.नदीम -श्रवण यांनी गाण्यासाठी कॉपी मारली पण त्या अगोदर 'काश्मीर की कली'आणि 'मेरे सनम' या दोन चित्रपटांनी 'कम सप्टेंबर'च्या कथेची कॉपी केली होती.

पण ते दिवस वेगळे होते.तेव्हा हॉलीवूडने न्यायालयीन प्रकरणांमध्ये वेळ वाया घालवला नाही.पण आता काळ बदलला आहे.कॉपी मारणं -ड्युप्लीकेशन करणं म्हणजेच चोरी करणं हा आता गंभीर गुन्हा मानला जातो.

इंग्रजी भाषेत याला प्लेजरिझम Plagiarism असं म्हणतात.

Plagiarism उच्चारायला एक अवघड शब्द आहे पण भारतात त्याचा अर्थ कॉपी मारा आणि पैसे कमवा असाच गृहित धरला जातो.  हा एक मोठा व्यवसाय आहे. कोणीही आक्षेप न  घेतल्याने नाही आणि कोणीही न्यायालयात न गेल्याने बरीच वर्षं भारतात या चोर्‍या वाढतच गेल्या. पण 'परन जय जालिया रे' या चित्रपटाच्या  बंगाली निर्मात्याला बॉलिवूडचा एक निर्माता विपुल अमृतलाल शाहने धडा शिकवला.

'परन जय जालिया रे'बंगाली चित्रपटाचे कथानक त्याच्या म्हणजे विपुल शाहच्या सुपरहिट फिल्म 'नमस्ते लंडन'ची कॉपी असल्याचे कळल्यावर तो थोडे दिवस शांत बसला.बंगाली भाषेत चित्रपट कसा चालतो आहे याचं निरिक्षण केलं.बंगाली चित्रपटही सुपर हीट झाल्याचं लक्षात आल्यावर तो कोर्टात गेला. बंगाली चित्रपटाला आधी खालच्या कोर्टाने आणि नंतर कलकत्ता उच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घातली.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर  दोन्ही निर्मात्यांनी  न्यायालयाच्या बाहेर खटला मिटवला.बंगाली निर्मात्याने विपुल अमृतलाल शहाला ७५ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली.चित्रपटाच्या एकूण निर्मितीला २ कोटी  खर्च आणि सेटलमेंट ७५ लाख !!

त्याखेरीज बंगाली चित्रपटाच्या निर्मात्याला'विपुल अमृतलाल शाह यांचा चित्रपट'नमस्ते लंडन' या चित्रपटावर आधारीत' असं टायटल क्रेडीट  प्रदर्शित करण्यास भाग पाडण्यात आलं.

 

 

आता ही चित्रपटाची कथा असल्याने तुम्हाला मनोरंजक वाटली असेलच पण लक्षात घ्या Plagiarism फक्त त्यापुरते मर्यादित नसते. ते कुठेही घडत असते. उदाहरणार्थ एखाद्या उत्पादनाचं लेबल-डिझाइन याची कॉपी करण्म म्हणजे पण  प्लेजरिझम असते.

आमचे अनेक वाचक उद्योग क्षेत्रात आहेत त्यांना या लेखाचा नक्कीच उपयोग होईल असे आम्हाला वाटते पण त्यासाठी तुमचा ब्रँड -त्याचा लोगोची अधिकृतरित्या नोंदणी करणे आवश्यक असते. हे नोंदणीकरण आयपी राइट्स म्हणजेच बौध्दिक संपदेच्या कायद्याअंतर्गत करता येते.

असेच काही मनोरंजक किस्से येत्या काही दिवसात वाचू या !

सबस्क्राईब करा

* indicates required