रोहित शेट्टीने एका फिल्म मधून केली ४ फिल्म्सची घोषणा !!

मंडळी, यावर्षी पहिल्यांदाच असं घडलंय की एकाच फिल्म मधून ४ फिल्म्सची घोषणा झाली आहे. सिम्बा मधून रोहित शेट्टीने त्याचा पुढच्या फिल्म्सबद्दल ‘हिंट्स’ दिल्या आहेत. त्या कोणत्या फिल्म्स आहेत ? चला पाहूयात.

सिम्बाचा सिक्वल ‘सिम्बा २’, गोलमाल ५, सिंघम ३, सूर्यवंशी. या त्या ४ फिल्म्स...

मंडळी, सिम्बाच्या गाण्यामधून गोलमालच्या टीमने गोलमालच्या पुढील भागाची घोषणा तर केली होतीच आणि अजय देवगणने ट्रेलर मधूनच सिंघम ३ येणार हे सांगितलं होतं, पण चित्रपटाच्या शेवटी अक्षय कुमारच्या एन्ट्रीने सगळ्यांना धक्का दिला. अक्षय रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ (सुर्यवंशम नव्हे) चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. अक्षय आणि रोहित शेट्टी हे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

मंडळी, रोहित शेट्टीने बहुतेक ‘पोलीस पिच्चर’ बनवण्याचे हक्क विकत घेतलेत. या चार मधून ३ चित्रपट तर पोलिसांवर आधारितच आहेत. गोलमाल ५ पण पोलीस कथेवर आधारित नसावा म्हणजे मिळवली.  

सबस्क्राईब करा

* indicates required