सैराट चा आता हिंदी रिमेक, करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन्स करणार निर्मिती

मराठीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सैराटनं महाराष्ट्राच्या जनतेला याड लावलं होतं. परश्या आणि आर्ची आजही लोकांच्या मनावर मोहिनी घालून आहेत. सैराटच्या इतर भाषिक रिमेकची चर्चा अनेक वेळा आली आहे पण आता हिंदीत सैराटच्या रिमेकची चर्चा आहे. एका सिने ट्रेड विषयक मासिकाने ही बातमी आमच्या समोर आणली आहे. 

तर म्हणे करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. सैराटची मूळ प्रोड्युसर झी  या प्रॉजेक्टमध्ये सहनिर्माती आहे. या बातमीनुसार सैराटची स्टोरी संपूर्ण भारताला अपील होण्यासाठी सध्या पुन्हा एकदा लिहिण्यात येत आहे.  

तर हा झाला बातमीचा भाग, पण नागराज मंजुळे या सारख्या गुणी डायरेक्टरने तयार केलेल्या या चित्रपटाचं हिंदीत काय होणार हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. खरे तर सैराट जर इतर डायरेक्टर ने बनविला तर कसा होईल हा विनोदी प्रयोग पण आपण वाचला आहे. पण  अहो, चोप्रा-जोहर लोक आर्ची आणि परशा पळून स्वित्झर्लंडला जातात असे दाखवणार तर नाहीत ना? कोण असेल आर्ची आणी परश्याच्या भूमिकेत? 

 

सबस्क्राईब करा

* indicates required