computer

सैराट ने रचला इतिहास : हे आहेत मोठी कमाई करणारे टॉप-5 मराठी चित्रपट

बॉलीवूड आणी टॉलीवूड पाठोपाठ आता मराठी चित्रपट देखील कमाईचे नवनवीन विक्रम रचताना दिसत आहेत. पाहूया सर्वोच्च कमाई करणारे 5 मराठी चित्रपट

टिप: ह्या लेखात आलेले आकडे हे जालावरच्या विविध साईट वरून घेतलेले आहेत.

 - सौरभ माळी

 

५. कट्यार काळजात घुसली

 

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कट्यार काळजात घुसली' या संगित नाटकावर आधारीत चित्रपटाने जवळजवळ 35 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. सुबोध भावे, सचिन पिळगावकर, शंकर महादेवन यांचा अभिनय प्रेक्षकांना पुरेपूर आवडला.

४ . लय भारी

 

निशिकांत कामत यांच दिग्दर्शन, अजय-अतुल यांचं संगित आणी रितेश देशमुख अभिनीत 'लय भारी' या चित्रपटाने कमाईचे सगळे विक्रम मोडत 40 कोटींपर्यंत मजल मारली !

३. टाईमपास 2

 

टाईमपास प्रमाणेच त्याचा सिक्वेल - टाईमपास 2 देखील संपूर्ण महाराष्ट्राच्या पसंतीस उतरला. प्रियदर्शन जाधव,  प्रिया बापट, प्रथमेश परब अशी स्टारकास्ट असलेल्या या प्रेमकथेवर आधारीत चित्रपटाने 43.23 कोटींचा आकडा गाठला.

२. नटसम्राट

 

महेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन आणी नाना पाटेकर यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर 'नटसम्राट' या चित्रपटाने बाजी मारली आणी कमाई केली ती 48.32 कोटींची.. यात विशेष लक्षवेधी ठरला तो नाना आणी विक्रम गोखलेंचा कसदार अभिनय !!

१. सैराट

 

नुकताच प्रदर्शित झालेल्या 'सैराट' ला  घवघवीत यश मिळताना दिसतंय. 
'सैराट' ने आतापर्यंत 17 दिवसात जवळपास 55 कोटींचा आकडा पार करत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनण्याचा मान मिळवला. रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, तानाजी गलगूंडे, सलिम शैख या नवोदितांचा अभिनय, नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन, अजय-अतुल यांचं संगित आणी वास्तविक भाष्य करणारी कथा प्रेक्षकांच्या मनाला चांगलीच भावली..

अपडेट: नुकत्याच  उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सैराट्ने ७० कोटींचा आकडा ओलांडून शंभर कोटींकडे वाटचाल सुरू केली आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required