GPS ने नेले एका कारला 100 फूट खोल तळ्यात

तुम्ही गाडी चालवताना रस्ता शोधण्यासाठी GPS किंवा गुगल मॅप्स सारखे ऍप नक्कीच वापरत असाल.  त्या ऍपने कधी तुम्हाला चुकीच्या ठिकाणी पोहचवले आहे का? नाही ना? मग ही  बातमी वाचून तुम्हाला हुश्श  करावे वाटेल.

कॅनडाच्या ओंटेरियों शहरात एक 23 वर्षीय महिला गाडी चालवत होती. तिला या भागाची माहिती नसल्यामुळे ती  अर्थातच GPS चा वापर करत होती. नॅव्हिगेशनमधल्या गडबडीमुळे तिची गाडी सरळ 100 फूट खोल तळ्यात गेली. बाहेर भरपूर धुके असल्यामुळे गाडी चालविणे कठीण होते. सुदैवाने गाडीची पॉवर बंद होण्यापूर्वी खिडकीतून ती महिला बाहेर पडू शकली. तळं 100 फुट खोल होतं आणि पाण्याचे तापमानही 4 डिग्री सेल्सियस!


नशीबानं  या प्रकरणात कोणालाही इजा झाली नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required