शिव छत्रपती सिनेमाचं ट्रेलर पाहिलं का?

Subscribe to Bobhata

अरबी समुद्रात छत्रपतींचं स्मारक व्हावं की नाही यबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत आणि त्याचेवेळेस रिलीज झालंय 'शिव छत्रपती' या आगामी सिनेमाचं ऑफिशिअल ट्रेलर. 

महाराजांच्या जीवनावर आजवर बरेच सिनेमे, मालिका आणि पुस्तकं निघाली आहेत. त्यातच भर पडतेय या सिनेमाची.  दोन-तीन वर्षांपूर्वी कलर्स चॅनेलवर 'वीर शिवाजी' नावाची एक मालिका यायची. कधी पाहिली आहे का तुम्ही? पाहिली नसेल तर तुम्ही खूप सुदैवी आणि हुशार आहात. त्यांनी महाराजांच्या खाजगी आणि राजकीय आयुष्याची पार सास-बहू मालिका करून टाकली होती. आणि कहर म्हणजे आजवर आपण कधी न ऐकलेले-न वाचलेले प्रसंग मालिकेमध्ये घुसडले होते. हा शिव छत्रपती  ट्रेलर बघून त्या वीर शिवाजी मालिकेची आठवण होतेय पाहा. गरागरा डोळे फिरवणारी आणि इतर बायकांना मागे ढकलून पुढे येणारी बाई आधी सोयराबाई असेल असं वाटतं, पण लगेच ती बाई  राजमाता जिजाऊंचा डायलॉग  टिपिकल मालिकाछाप थाटात फेकते.  त्यामुळं या सिनेमाबद्दल फार काही आशा ठेऊ नयेत हेच खरं. 

सिनेमात उदय सोनावणे, सचिन राऊत, पंकज देशमुख, श्वेता काळे, सिद्धार्थ शिलिमकर, अभिजीत कदम, अबोली साठे, तेजस्विनी एडके, निखिल मराठे, सोमेश्वर काळजे यांच्या मुख्य भूमिका आहेत आणि सुहास बार्फे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.  हे लोक कोण आहेत हे मात्र विचारू नका, या प्रश्नाचं उत्तर गुगलकडे सुद्धा नाहीय. 

'लई भारी' सिनेमानंतर रितेश देशमुख छत्रपती शिवाजी नावाचा सिनेमा करणार होता आणि त्यात तो शिवरायांची भूमिका साकारणार होता. युट्यूबवर त्यामुळं काही लोकांनी 'शिव छत्रपती रितेश देशमुख' असं लिहिलंय. पण तुम्ही त्याला फसू नका बरं..