स्टॅन लीच्या ‘चक्रा: द इंव्हिन्सीबल’वर बॉलीवूड सुपरहिरो चित्रपट

तुम्ही सुपरहिरो फिल्म्सचे चाहते आहात का? बॅटमॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅनचे चित्रपट पाहायला तुम्हाला आवडतं का?  भारतीय कॉमिक्समधल्या सुपरहिरोवर म्हणजेच नागराज, डोगा, सुपर कमांडो ध्रुव यांच्यावर चित्रपट निघावा असे तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आवडेल.

कॉमिक्स जगताचा लिजंड आणि मार्वेल कॉमिक्समधल्या अनेक कॅरेक्टर्सचा जनक स्टॅन ली यांच्या ’चक्रा’वर आता चित्रपट बनतोय. ‘चक्रा:द इंव्हिन्सीबल’ ही ऍनीमेटेड मालिका स्टॅन ली आणि शरद देवराजन यांनी मिळून बनवली होती. 2013 मध्ये हा चित्रपट कार्टून नेटवर्क या चॅनलवर दाखवण्यात आला होता.

चक्रा हा मुबंईमध्ये राहणारा टेक जिनियस आहे. त्याच्याकडे असलेला सूट त्याच्या शरीरातले सात चक्र जागृत करतो. भारतीय तत्वज्ञानाचा बेस या सुपरहिरोकडे असणाऱ्या सुपरपावरला देण्यात आला आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये स्टॅन ली स्वतः भाग घेणार आहे. सिनेमाची निर्मिती अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटावणी यांची फॅंटम  संस्था करणार आहे तर उडान आणि लुटेराचा दिग्दर्शक विक्रमादित्य चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

या पूर्वी ही भारतात क्रिश सारख्या सुपरहिरो फिल्म्स बनविण्याचा प्रयत्न करण्यात आल्या आहेत, पण हॉलिवूड मध्ये बनणाऱ्या चित्रपटाची सर त्यांना नाही. या टीमकडे बघून  मात्र या सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. बघूयात हा चित्रपट अपेक्षांवर खरा ठरतोय का?

सबस्क्राईब करा

* indicates required