या फोटोत तुम्ही भुजबळांना ओळखु शकता का?

एकेकाळी राजकारणातले महत्वाचे व्यक्तिमत्व राष्ट्रवादी कॉग्रेसचे ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांची ओळख होती पण आज त्यांचा थकलेला, आजाराने जर्जर झालेला फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मार्चच्या महिन्यात अटक झाल्यापासून त्यांनी 10 किलो वजन गमावले आहे. या फोटो मध्ये पूर्ण पांढरी दाढी आणि थकलेल्या अवस्थेत ते हॉस्पिटल मध्ये दिसतात

यापूर्वी त्यांचे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणे हासुद्धा वादाचा विषय झाला होता. त्यांनी दातदुखीची तक्रार केली असताना त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. या संदर्भात चौकशी चालू आहे.

छगन भुजबळ आणि त्यांचे नातेवाईक महाराष्ट्र सदन घोटाळ्यात सध्या अटकेत आहेत. भुजबळांनी आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने ह्या आरोपांचे खंडन केले आहे. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारची ही राजकीय चाल असल्याचे त्यांचे मत आहे.

image source

सबस्क्राईब करा

* indicates required