computer

या व्यापाऱ्याने वाढदिवसानिमित्त कैद्यांना दिली आगळीवेगळी भेट....

(प्रातिनिधिक फोटो)

मंडळी, वाढदिवशी पार्टी करण्याचा ट्रेंड आहे, पण काही लोक हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. झाडे लावणे, अनाथाश्रमाला भेट देणे, रक्तदान करणे अशी काही वेगळी कामे करुन ते वाढदिवस साजरा करतात.  आग्र्याच्या एका धनिक व्यापाऱ्याने पण आपल्या ७३ व्या वाढदिवशी असंच हटके काम केलंय. त्याने चक्क १७ कैद्यांना जामिन मिळवून दिला आहे.

मंडळी, या व्यापाऱ्याचं नाव आहे मोतीलाल यादव. त्यांनी ३२,३८० रुपये भरून १७ कैद्यांना सोडवलंय. या कैद्यांवर लहानसहान आरोप होते. त्यांना जामिनावर सुटता येत होते, पण त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते तुरुंगात खितपत पडले होते. सागर नावाच्या कैद्यावर तर वागणूक चांगली असूनही केवळ १०८९ रुपये नसल्याने तुरुंगात राहण्याची वेळ आली होती. तो वर्षभरापासून तुरुंगात होता.

मोतीलाल यादव यांना ही कल्पना एका बातमीवरून सुचली. बातमी एका व्यापाऱ्याची होती. त्याने त्याच्या वाढदिवशी कैद्यांना स्टीलचे पेले वाटले होते. ही बातमी वाचून आपणही असंच काही तरी केलं पाहिजे अशी कल्पना मोतीलाल यादव यांना आली. मुलगा वकील असल्याने त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं.

मंडळी, या १७ मधले आठजण हे बाहेरील राज्यातील होते. मोतीलाल यादव यांनी त्यांच्या खाण्यासाठी आणि प्रवासासाठी त्यांना वेगळे पैसे देऊ केले. 

तर मंडळी, वाढदिवस साजरा करण्याची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली? तुमचं मत नक्की द्या !

सबस्क्राईब करा

* indicates required