computer

राजकुमार रावच्या अभिनयाने सजलेले १० अफलातून सिनेमे !!

नवीन फळीतील अभिनेत्यांमधला एक आघाडीचा अभिनेता म्हणून ‘राजकुमार राव’ समोर येत आहे. लव, सेक्स और धोका पासून सुरु झालेला त्याचा प्रवास रागिणी एमएमएस, गँग्स ऑफ वासेपूर, शाहीद, तलाश, ‘काय पो छे’, ट्रॅप्ड सारख्या सिनेमानंतर आगामी येणारा न्यूटनपर्यंत सुरु आहे. राबता सारख्या टुकार चित्रपटात देखील त्याच्या आगळ्यावेगळ्या लुकमुळे तो चर्चेत आला. या सर्व वर्षात त्याच्या अभिनयाचा ग्राफ वाढताना दिसत आहेत.

 

आज आपण बघणार आहोत याच उमद्या कलाकाराच्या अभिनयाने सजलेले टॉप १० सिनेमे.

१०. लव सेक्स और धोका !

ही पूर्ण फिल्म एखाद्या सीसी टीव्ही फुटेजप्रमाणे आहे. अश्या फिल्मपासून आपल्या करीयरची सुरुवात करावी हे नवलच. राजकुमार रावचा हा पहिलाच सिनेमा होता.

९. रागिणी एमएमएस

या सिनेमातून त्याच्या अभिनयाची चमक दिसण्यास सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. सिनेमाचा विषय आणि हाताळणी सोडली तर बघण्यासारखा फक्त राजकुमारचा अभिनय होता.

८. हमारी अधुरी कहानी

या सिनेमातून राजकुमार रावचं अभिनयातील वेगळेपण दिसलं. यात तो एका अतिरेक्याच्या भूमिकेत आहे.

७. शाहीद

राजकुमार रावचा हा सर्वोत्तम अभिनय असलेला सिनेमा म्हणता येईल. फिल्मफेअर, राष्ट्रीय पुरस्कार या दोन्हीत राजकुमार रावने बाजी मारली. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये त्याला तोंडाला काळं फासून उभं केलं होतं. सत्यकथेवरती आधारित असलेला हा एक सुंदर सिनेमा होता. 

६. गँग्स ऑफ वासेपूर 2

राजकुमार राव ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या दुसऱ्या भागात आपल्याला दिसतो. नवाझुद्दिन सिद्दिकीने संपूर्ण पडदा व्यापला असला तरी आपली खास ओळख त्याने याही सिनेमात बनवली आहे.

५. सिटी लाईट्स

या सिनेमाला कथानकाबरोबरच राजकुमारच्या अभिनयासाठीही ओळखलं जातं. या सिनेमातून त्याने आणखी एकदा आपल्या अभियानाची चमक दाखवली होती.

४. काय पो छे

चेतन भागातच्या ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ या पुस्तकातील गोविंद पटेल या पत्राला राजकुमारने जिवंत केला. पुन्हा एकदा आपलं पात्र साकारण्याचं वेगळेपण यात दिसून येतं.

३. क्वीन

क्वीनमध्ये कंगनाने पूर्ण पडदा व्यापला आहे. वाट्याला आलेल्या मोजक्याच सिन्समध्ये सुद्धा त्याने छान लज्जत आणलीये.

२. अलिगढ

यात राजकुमार राव दिल्लीतल्या एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. मनोज वाजपेयी बरोबर त्याची जुगलबंदी जमून आली आहे.

१. ट्रॅप्ड

ट्रॅप्ड राजकुमार रावच्या अभिनयाचं कसब लागलेलं आहे. संपूर्ण फिल्ममध्ये तो एकटाच दिसतो.  ‘कस्ट अवे’ चा फील देणारी ही फिल्म फक्त आणि फक्त राजकुमार रावमुळे मनाला भिडते.

 

 

एखाद दुसरा अपवाद सोडता आम्हाला तर यातले जवळजवळ सगळे सिनेमे आवडलेयत...तुमचं काय मत आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required